पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ रावांची पराक्रमशक्ति माहीत असल्यामुळे व त्यांच्याशीं गोडीगुलाबीनें वाग- ण्यावांचून गत्यंतर नसल्यामुळे, त्यानें तत्तनशीन झाल्याचे आनंदवृत्त बाजीरा- वांस कळविलें; व मराठ्यांचा स्नेह संपादन करण्याकरितां कांहीं बहुमूल्य पोषाक व पूर्वी दिलेल्या हकांची व जहागिरींचीं सनदापत्र पाठवून दिलीं तीं बाजी- रावांस छ० २४ सफर ( ता० २२ मे इ० स० १७३९) रोजीं खानदेशांत असतांनाच मिळाली. अर्थात् बादशाहाचा असा प्रेमभाव आहे असे पाहतांच, बाजीरावांनीं त्यास राजी राखून व मदत करून, आपले कार्य नम्रपणानें साधून घेण्याचा विचार केला. दिल्लीच्या बादशाही तत्ताविषयीं शाहु महाराजांची फार पूज्यबुद्धि असल्यामुळे सर्व मराठे इष्टकार्य साधल्यास त्याचा मान ठेवण्यास कधींही मांगें पुढे पाहात नसत. ह्या राजकारणासंबंधाने बाजीरावांनीं चिमाजी आपांस एक पत्र लिहिले आहे. तें फार वाचनीय आहे. “आशीर्वाद उपरी “महमदशाहा याची पादशाही गेली होती; परंतु ईश्वरें पादशाही काईम राखिली. त्यास आपण राजकारण राखून अमीरुल उमरा यासारिखें व्हावें. पोटास फौजेस लागेल तें आह्मी पातशाही माल पैदा करून त्यांत घेऊं. उरला पैका खजाना दाखल व्हावाया फौजेस जागिरा अलाहिदा मागाव्या; आणि सर्वोस माजी करावें; आणि पातशाही बंदोबस्त करून द्यावा. लौकिक मोठा आहे. कैसा ह्मणाल तरी जीर्णोद्धार देवालयाचा के- ल्यास नवीन लिंगाचे स्थापनेपेक्षां अधिकोत्तर आहे. महमदशाहाचे पातशा- हीचा बंदोबस्त केल्यास लौकिक मोठा आहे. मोडून टाकिल्यास लौकिक नाहीं. दुसरी गोष्ट, हजारों चोर पोर खातील; आणि पातशाही मोडल्याचें श्रेय आप णाकडे. दुसरें, राजश्री छत्रपति स्वामीही पातशाही इच्छीत नाहींत. जीर्णोद्धार केल्यास संतोष मानितील." ह्मणून राजश्री बाबूराव मल्हार यांणीं लिहिलं आहे. दुसरें त्यांणीं लिहिलें आहे जे, “हा विचार चित्तास उत्तम भासेल तरी स. तारकुलीखान गाजुद्दीखानाकडील येथे कामांतून बोलावून आणून, त्यासी दक्ष- णेच्या बंदोबस्ताविसों गाजुद्दीखानांहीं मान्य करावें आह्मी ते दुसरा पदार्थ महमदशाहाकडेही नाहीं. समाधान करूं. ह्मणजे दक्षण निर्व्याकुल होईल. राजकारण ( राहील). स्वामींस त्यांणीं हातीं धरावें आणि बंदोबस्त करून घ्यावा. येविसीं चालणा करूं. यामध्यें जैसी आज्ञा होईल तैसी वर्तणूक करूं.