पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ , एक दोन हजार हशम पाटवाल तेव्हां तेव्हांच गडकोट किल्ले हस्तगत होतील; व अंमलही बंद होईल. तरी लिहिल्याप्रमाणे मातबर आणि शाहणा माणूस पाठविला पाहिजे. व फौज, हशम व कारकून व पागा पाठविल्या पाहिजेत. आह्मी बन्हऱ्हाणपुराजवळ मुक्काम करून खानदेशचा बंदोबस्त करितों. तुझी वसईचा प्रसंग लौकर उरकून घांटावरी आले पाहिजे. कुल मोंगलाई अम- लाचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यास, तुझी मातबर फौजेनिसीं औरंगाबादेज- वळ बसल्यानें, दौलताबाद सरकारचा अंमल कुल बंद होऊन, टक्का पदरीं पडेल. या मनसवियापेक्षां अधिकोत्तर दुसरा मनसवा आहे ऐसा अर्थ नाहीं. माळ- वाप्रांत एक सरदार पाठवावा लागतो. तरी पाठविला पाहिजे. तेथें फौज आहे, त्यांत जे जे सरदार व जे जे फौज रिकामी होत जाईल, तें पाठवीत जाणे. रा० बाबूराव मल्हार मोठ्या संकटांत होते. श्रीनें अरिष्टांतून काढिलें. सामान्य गोष्ट न जाहली. बरें प्रस्तुत तोहमास्तकुलीनें बाजी जिंकली आहे. परंतु औध्या हिंदूनी हिंमत बांधल्यास व आमच्या फौजा मातबर गेल्यास हिं दूंचीच बातशाही होईल, ऐसा प्रसंग दिसतो (पुढील मजकूर फाटला आहे ).” , ह्यावरून ह्या वेळीं सर्वत्र हिंदुपदपादशाही करण्याचा व जरूर पडल्यास ना- दिरशहाशीं देखील टक्कर देण्याचा बाजीरावांचा संकल्प दिसतो. परंतु तेथपर्यंत प्रसंगच आला नाहीं. कारण, नादिरशहानें महमदशहास पुनः दिल्लीच्या तक्तावर बसवून व अपरिमित लूट घेऊन स्वदेशास गमन केलें. महमदशहास बाजी- १ ग्रांटडफ साहेबांनी लेखांक ४१ ४२ व हे पत्र पाहिले असावे असे दिसते. त्यांनी "Hindoos and Mussulmans.” Says Bajee Rao, "the whole power of the Deccan must assemble, and I shall spread Mahrattas from the Nurbuddah to the Chumbul. " खणून बाजीरावाच्या ज्या शब्दांचे अवतरण दिले आहे, ते वरील पत्राच्या शेवटच्या फाटलेल्या भागांतील एखाद्या आवेशयुक्त वाक्याचें ढोबळ भाषांतर असावें असें दिसतें. ह्या पत्रांत खुद्द बाजीरावांच्या हातचा शेवटचा मजकूर आहे. परंतु दुर्देवानें पत्राचा पुढील भाग गहाळ झाल्यामुळे तो सांपडण्यास मार्ग नाहीं ! "