पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण भरंवसा ठेवून, फार हिंमत धरिली; आणि आपल्या शूरपणाच्या वाण्यास साजेल असेंच वर्तन केलें. दिल्लीकडील पेशव्यांच्या वकि लांची पत्रे येऊन, तिकडे मोठी राज्यक्रांति झाली व भयंकर अनर्थ गुदरले, असे वृत्त कळतांच, बाजीरावांनी ब्रझेंद्रस्वामींस व चिमाजीआपांस पत्रे पाठविलीं ब्रह्मेद्रस्वामींस लिहिलेली पत्रे ४१ व ४२ ह्या लेखांकांखालीं सादर केली आहेत. तीं अत्यंत महत्वाची असून बाजीरावांच्या वीर्यशालि- त्वाचीं व गुरुभक्तीचीं पूर्ण दर्शक आहेत. लेखांक ४२ ह्यामध्ये बाजीरावांनीं स्वामींस लिहिले आहे कीं, तोहमास्तकुलीखान “दक्षिणप्रांत स्वार होणार आहेत. याजउपरी त्यास आणखी कोणी गनीम आहे असें नाहीं. आह्मी त्यास व ते आह्मांस गनीम आहों.” अशास “जों ते तेथून निघाले नाहींत, तों तमाम मराठ्या फौजा एक होऊन चमेली पार व्हावें, त्यास अलीकडे येऊं न ● , द्यावे, असा विचार आहे.” ह्या बाणेदार विचाराप्रमाणे बाजीराव पेशवे ह्यांनी चिमाजीआपांस वसईची मोहिम लवकर आटोपून मदतीस येण्याबद्दल पाचारण केलें. हे पत्र येणेप्रमाणे :- - “श्रियासह चिरंजीव राजश्री आपा यांसी:- बाजीराव बहाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल ता० छ० जिल्हेज जाणून आपणाकडील कुशल लिहीत जाणे. यानंतर रा० व्यंकोजी राम यांची व रा० धोंडो गोविंद यांची पत्रे आली. त्यांच्या नकला काल छ० २३ रोजीं क सोलनिंभोरें येथील मुकामहून प्रातःकाळी रवाना केल्या आहेत. पावल्या असतील. तदोत्तर काल सायंकाळ मुक्काममजकुरीं, राजश्री बाबूराव मल्हार. 'यांची पत्रे सवाई जयपुरचे मुक्कामीहून आली. त्यांच्या नकला करून घेऊन अस्सल पत्रे तुझांस अवलोक व्हावी यास्तव पाठविली आहेत. यावरून सवि- स्तर वर्तमान कळेल. सारांश, अमिरांनीं व पातशाहांनीं नाहिंमतीनें फजिती करून घेतली. निजामउल्मुलुक याची अवस्था सर्वांपेक्षां कनिष्ठ आ (हे). अतःपर दक्षिणेत म्लेंच्छांचे नांवास तारांडी द्यावी ऐसा विचार नाहीं. तमाम अंमल बंद करून गडकोट किल्ले हस्तगत केले पाहिजेत. त्यास, कमाविसदा- रांस आह्मीं किडयांचा व अंमल बंद करावयाचा मजकूर लिहिला आहे. परंतु त्यांच्यानें कार्य होईल, जेव्हां तुझीं शाहणा मातवर माणूस, दोन चार हजार फौज, -