पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ स्वामींचें पत्र सापडलें तर बरीच मनोरंजक माहिती ह्यांत सामील करिता येईल. देवास नवस करून लोकांची कार्यसिद्धि करून देण्याचा स्वामींचा क्रम प्र सिद्धच आहे. त्याबद्दलचे उल्लेख स्वामींच्या व पेशव्यांच्या पत्रांत अनेक आहेत. वसईचा नवस फेडण्याकरितां भुलेश्वरास पुतळ्या व रुपये पाठवून दिल्याचा उल्लेख चिमाजी आपांच्या लेखांत ५३-५४ ह्या पत्रांत आहे. ही सर्व पत्र पाहिलीं ह्मणजे स्वामींची आपल्या उपास्यदैवतावर व लोकांची स्वामींवर, अत्यंत दृढ निष्ठा होती एवढे सिद्ध होतें. व वर सांगितलेलीं देवभोळेपणा अथवा लोकभ्रम ह्यांची उदाहरणे सर्व राष्ट्रांच्या जुन्या इतिहासांत दिसून येतात. त्याअर्थी कोणत्याही राष्ट्राच्या असंस्कृत दशे- मध्ये हे प्रकार असावयाचेच व त्याप्रमाणे ते महाराष्ट्रामध्येही होते, इतकेंच मानिले पाहिजे. , भाग ७ वा. 40:08 स्वामींचें निर्याण व उपसंहार. " वसईच्या स्वारीमध्यें चिमाजीआपा व शिंदे होळकरादि प्रमुख मराठे सर- दार गुंतले असतांना, बाजीराव पेशवे हे खानदेशांत असून, तिकडील राजकीय मनसबे पाहात होते. तो त्यांस तोहमास्तकुलीखान ऊर्फ नादिरशाहा त्यानें दिल्लीवर चाल करून तेथील बादशाही गारत केली, व तो दक्षिणेकडे येण्याच्या विचारांत आहे, अशीं बातमीपत्रे आली. वसईच्या मोहिमेंत सगळे मराठे- सैन्य गुंतल्यामुळे व खर्चास पैसा नसल्यामुळे, “हिंदुलोकांस संकट थोर प्राप्त झालें,” असे बाजीरावांस वाटले. ह्मणून त्यांनी आपले पूज्य गुरु व साहाय्य कर्ते श्रीमत् ब्रह्मद्रस्वामी ह्यांस हे सर्व वृत्त निवेदन केलें; आणि ह्या महदरि- टांतून कसे मुक्त व्हावे ह्याबद्दल त्यांचा उपदेश विचारिला. स्वामींनीं ह्या वेळी बाजीरावांस कसें उत्तेजन दिले व कोणता हितमंत्र सांगितला, हे समजण्यास मार्ग नाहीं. तथापि, बाजीरावांनी ह्या प्रसंगी आपला धीर न सोडतां, आपल्या