पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्वैतवादी श्री रामानुजाचार्य हे होते. बुंदेलखंडांतील छत्रसाल राजाचे गुरु प्राणनाथ प्रभु नामक एक सत्पुरुष होते. अशी ही धर्मोपदेशक राजगुरूंची नाममालिका हिंदुस्थानामध्ये सर्वत्र दृष्टीस पडते. ही पूर्वीची परंपरा मराठी राज्यामध्येंही कायम होती. शिवाजीमहाराजांचे सद्गुरु श्री समर्थ रामदास यांनीं राज्यसंस्थापनेस शिवाजीमहाराजांस साहाय्य केलें. ह्या सत्पुरुषाचें चांगलें चरित्र अद्यापि प्रसिद्ध झालें नाहीं, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. “शिवदि- ग्विजय" बखरीच्या कर्त्यानें रामदासस्वामींविषयीं एके ठिकाणीं असे लिहिलें आहे की, “ स्वामी केवळ वैराग्यशील, ज्ञानसंपन्न, आचारशील, न्यायनिष्ठुर, विचारशील, कर्मनिष्ठ, मननशील, सदाशुचिष्मंत, प्रत्ययशुद्ध, कुशाग्रमति, नि- जात्मबोध, भगवद्गुणानुवर्णनीं प्रीतिपुरस्सर परमउल्हास, हरिकीर्तनीं सदासर्व- काळ ध्यानस्थ, प्रपंचकार्यार्थी उदास, रामभक्तीचा घोष, उदंड सत्चर्चा, अखंड ध्यानधारणा, प्रचंड सदाचारी, मार्तडयंत्रतंत्रों निरिच्छता, मोहाभिमानीं अलिप्तता, रामपूजनीं सावधता, कुश्चल कुनिंदा करणारांची धूर्तता, ग्रंथावलोकन बोधक्रम, चातुर्याविषयीं निपुणता, सर्व प्रयोजन विचार जाणता, असे अद्वितीय पुरुष भगवंताची साक्षात् विभूति जगदोद्धारार्थ निर्माण झाले.” ह्या एका वा क्यावरूनच ह्या महात्म्याची योग्यता व्यक्त होते. अशा पुण्यपुरुषास शिवाजी- महाराजांनीं आपलें गुरुस्थान द्यावें, आणि “श्री सद्गुरुवर्य, श्री सकलतीर्थ- रूप, श्री कैवल्यधाम ” अशा भक्तिरसपूर्ण विशेषणांनीं संबोधित जावें, ह्यांत आश्चर्य तें काय ? रामदासस्वामींनंतर मराठी राज्यांत सर्ववंद्य व सर्वप्रिय असे महापुरुष श्रीमत् परमहंस बोंद्रस्वामी हेच होत. रामदासस्वामींच्या नंतर हे कांही दिवसांनीं प्रकट झाले, ह्मणून हे रामदासस्वामींचा अवतार होत असें भाविक लोक मानितात. रामदासस्वामींच्या कृपासाहाय्यानें मराठी राज्याची संस्थापना झाली, आणि ब्रह्मद्रस्वामींच्या कृपासाहाय्यानें मराठी राज्याचा अभ्यु दय झाला, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. त्यामुळे ह्या दोन्हीं सत्पुरुषांची चरित्रे महत्त्वाची असून, त्यांत मराठ्यांच्या इतिहासाचें सर्व हृद्गत भरले आहे. ह्मणून ह्या दोन चरित्रांस मराठ्यांच्या इतिहासांत आद्य स्थान देणे आवश्यक आहे. , , , मराठी राज्यांत रामदासस्वामी व ब्रह्मद्रस्वामी ह्या दोन महापुरुषांप्रमाणें आणखीही कित्येक साधुपुरुष अवतीर्ण झाले होते; व त्यांचा कमजास्त प्रमाणानें