पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ देवीस माणूस पाठविले आहे. तेथून निवाडा होऊन येईल तेही लिहून पाठ- वितों. विदित होय.” ह्याप्रमाणेच ग्रामदेवतांच्या कृपेअवकृपेबद्दलही त्या वेळच्या लोकांचे चमत्का- रिक समज होते असे दिसते. स्वामी देशावर आल्यानंतर श्री परशुराम येथील देवाच्या पादुका स्वामींनी रसाळगडाचे हवालदार संभाजी शिंदे ह्यांच्या स्वा धीन केल्या होत्या. त्यांची पूजाअर्चा त्यांनी चालविली. परंतु ती तेथील ग्रामदेवीस न अवडल्यामुळे त्या देवीनें महदरिष्टें पाठविलीं. अशाबद्दल एक मौजेचें पत्र संभाजी शिंदे यांनी छ०९ सवाल रोजी स्वामींस लिहिले आहे. त्यांत “श्रीच्या पादुकांची स्वामींच्या आज्ञेप्रमाणे पूजा चालली. छपरपलंगास निराळे देवालय बांधोन तेथे सर्व साहित्य ठेविलें. पूजाअर्चा होऊन अधिष्ठान चाललें. हे गोष्ट श्री देवीचे चित्तास न ये सारखी झाली. स्वामी ह्मणतील कीं 'या , मार्गे लिहिले नाहीं, उणेपुरे सव्वा वरीस जालें. आतां लिहितात' ! तरी हे गोष्ट आह्मांस कांहीं ठाऊक नव्हती. पादुका छपरपलंगावरी मांडोन पूजा चालों लागली. यावरी पंधरा दिवस जाहले. तो आपले भाऊ दिगोरीहून भेटीस आले. सर्वांच्या भेटी झाल्या. तेच दिवशीं गणोजी पाटील याचा मूल मृत्यु पावला. त्यावरी विजयादशमीस पालखी शंगारोन, पादुका आंत घालोन, निशाणेदेखील सीमा उलंघनास नेली. व श्रीची पालखी नेली. आपटेपूजन होऊन भांडे मारले. त्याच्या कपरा एका मुलास लागोन तेथेंच मृत्यु पावला. ते समयीं आणखी कित्येक नाश जाहला होता. तेव्हां श्रीस विती लावोन पुशिलें. तेव्हां भार्गवाची पालखी काढिली याजनिमित्त ह्मणोन सांगितले. सत्य मिथ्या न कळे. याकरितां आह्नीं गईच करीत गेलों तो अकस्मात राघोपं- तावरी वीज पडिली. हें निमित्त जाहलें. देवाज्ञा जाहली गला... त्याजवरी दोनचार महदारिष्टें येऊन पडलीं. दुखणी लागलीं. ऐसा कित्येक प्रकार होऊं लागला. देवीस प्रसाद लावून पुशिलें. तेव्हां सांगितलें कीं, श्री भार्गवाच्या पादुका मांडोन पूजा होऊन अधिष्ठान चाललें याजनिमित्त अपकार होतात." इ० इ० मजकूर लिहिला आहे. ह्याप्रमाणें चिमणाजीपंत भागवत ह्यांसही निराळें पत्र लिहिले आहे. ह्याचा पुढें स्वामींनी कसा बंदोबस्त केला हे समजत नाहीं. तेव्हां सारे मिळून श्री " . कोठीस अन्न ला- किल्ल्यावरी लोकांस W