पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ पहा ) पुढे अंबाजी पाटलानें स्वामींस ता० ६ जानेवारी ३० स० १७३९ रोजी एक कतबा लिहून दिला. तो येणेंप्रमाणे :- - - “दमदोस्ती अंबाजीपाटील मौजे धावडशी सु ॥ तिस्सा सल्लासीन मया अलफ. साहेबांचे बंदगीस लिहोन दिल्हा कतवा ऐसा जेः- धावडसीचीं भुतें दोन संभनाक भगत याणें निवडिलीं आहेत. संभनाक मागेल त्याप्रमाणे हे वारितों. याजपुढे आमचे निसवत थळचे कांहीं भूतबाधा वाडियांत झाली तरी आपण दिवाणचे गुन्हेगार असो. छ ६ सौवाल." वरील दोन पत्रे मासल्याकरितां दिली आहेत. अशा प्रकारची आणखीही कित्येक पत्रे आहेत. ह्या सर्वावरून भुतांविषयींचा लोकभ्रम स्वामींच्या कालांत पुष्कळ अस्तित्वांत होता असे दिसतें. भुतासंबंधाच्या कल्पनांप्रमाणे देवास कौल लावणें, नवस करणें, वगैरे भोळ्या समजुती स्वामींच्या ठिकाणीं वसत होत्या, असेंही कांहीं पत्रांवरून दिसून येतें. बाळाजी हरि अंतुरकर नामक एका इसमास स्वामींनीं धावडशी गांवाच्या व्य वस्थेकरितां ठेविलें. परंतु पुढे त्यानें कांहीं लबाडी केल्यावरून त्यास कामावरून दूर केले, आणि त्याचे जागीं अंताजी नारायण यास नेमिलें. तेव्हां अंतुरकरानें वांकुडपणानें त्यावर भुतें घातलीं, व त्याचा नाश करण्याचा उपाय आरंभिला. ही गोष्ट स्वामींस कळल्यावर स्वामींनी धावडशीचे देवास कौल लाविला, व त्याचा पडताळा पाहण्याकरितां संभाजी शिंदे नामजाद किल्ले रसाळगड ह्यास तेथील देवीस कौल लावून पाहण्याबद्दल लिहून पाठविले. त्याप्रमाणे त्यानें किल्ल्यावरील देवीस कौल लावून ता० ५ जिल्काद रोज स्वामींस पुढील मजकूर लिहिला आहे— , - "वाळाजी अंतुरकर याजकडील लागभाग अंताजी नारायण याजकडे पडोन त्याचा नाश होतो. ते गोष्टीचें धावडशीचे देवास खरें जाहलें आहे. परंतु तुझ किल्ल्याचे देवीस विती लावून काय सांगेल तें लिहून पाठवणे. ह्म- णोन आज्ञा केली. आज्ञेप्रमाणें आह्मीं देऊळास जाऊन श्रीस प्रसाद लाविला. देवीनें सांगितले कीं, बाळाजी अंतुरकर याजकडील लागभाग अंताजी नारा- यण याजकडे होऊन नाश होतो. ऐसें खरें सांगितले. विदित होय. दखलीचे