पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ स्वामींच्या देवभोळेपणाच्या गोष्टी. स्वामींच्या पत्रव्यवहारावरून स्वामींच्या वेळच्या समाजस्थितीचा व देवभोळे- पणाच्या कल्पनांचा बराच प्रकाश पडतो. त्या वेळीं निस्सीम धर्मश्रद्धा व दृढ तम ईश्वरावलंबन हे दोन गुण सर्वत्र वसत होते. परंतु त्यांबरोबर, भूत पिशाच वगैरे संबंधाचे सद्धयांप्रमाणेंच कित्येक लोकभ्रम आणि अज्ञानजन्य विचार अस्तित्वात होते. खुद्द स्वामींचा भुताखेतावर विश्वास होता, व त्यांचीं कांहीं मतें अत्यंत देवभोळेपणाचीं होतीं, असें कांहीं गोष्टींवरून दिसून येतें. त्यांपैकी दोनतीन मासले येथें सादर करितोंः- - धावडशीकर अंबाजी पाटील ह्यांचें व स्वामींच्या लोकांचें वांकडे आलें. तेव्हां त्यानें स्वामींच्या वाड्यांत व कारकुनावर भुतें घातली. त्यामुळे कारकून लोक आजारी पडले व गुरेढोरें मेलीं. तेव्हां स्वामींनीं भगत नांवाचा एक देवऋषि आणून त्याच्याकडून भुतांचा निवाडा केला. त्यांत दोन भुतें निघाली. त्यामुळे स्वामी वाडा सोडून मोठ्या रागानें कृष्णेच्या कांठीं जाऊन राहिले. ह्या प्रसंगी त्यांनीं यमाजी शिवदेव मुतालिक यांस वाड्याचा बंदोबस्त करण्याक रितां जें पत्र लिहिले आहे, ते उपलब्ध झाले आहे. तें येणेंप्रमाणे :- - “चिरंजीव यमाजीपंत अण्णा यांसी आज्ञा. अंबाजी पाटील मु॥ धाव- डशी याचे निसवत दोन भुतें वाडियांत पडोन, कारकुनांचे घरीं दुखणीं पडली. गुरेढोरें मेलीं. भगतानें निवडिलें. त्याचे विल्हे करून वाटेस लावावीं, ते न लावीत. याजपुढे वाडियांत नास न व्हावा ऐसा कतबा मागितला. तो न देत. याजकरितां आम्ही निघोन रागें कृष्णेवरी गेलों. मागें वाडा आहे तो जतन करावयासि दहा घोडर्डी पाठविणें. पाटील गांवांत घोडियांस दाणा वैरण देतील.” ह्या संबंधानें स्वामींनी शाहु महाराजांपर्यंत तक्रार नेली. (लेखांक २५४ लोकांच्या श्रद्धालूपणांत होतो असे दिसतें. युरोपियन विद्वानांचेंही असेंच मत दिसतें. “ Miracle is the pet child of faith "– Goethe. “ It is the atmosphere of child-like credulity which pre- disposes men to require and accept these wonders and miracles as events of ordinary occurrence. "– Lecky.