पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ स्वामींचे अद्भुत चमत्कार. महाराष्ट्रांतील सर्व साधुसंतांसंबंधानें कांहींना कांहींतरी लोकोत्तर व अमानुष शक्तीच्या चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे ब्रह्मद्रस्वामी संबंधानेंही दोन तीन गोष्टी कागदपत्रांच्या पुराव्यांत सांपडल्या आहेत. त्या पुढें लि- हिल्याप्रमाणेः- - १ स्वामी केळीच्या पानावर बसून समुद्राची खाडी तरून जात असत. ही गोष्ट स्वामींच्या बखरींत दिलेली असून प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या भागांतही तिचा उल्लेख आलेला आहे. ● , २ पेशव्यांच्या राज्यांत पाऊस पडला नाहीं तर स्वामी अनुष्ठान करून पाऊस पाडीत असत. ह्याबद्दलचे दोन उल्लेख दृष्टीस पडतात. लेखांक ४५ ह्या चिमाजी आपांच्या पत्रांत “या प्रांतीं यंदा पर्जन्य आजि पावेतों पडला नाहीं. प्रजा बहुत श्रमी झाली. हें वर्तमान ती० रा० राऊ यांणीं स्वामींस निवेदन केलें. त्यावरून स्वामी कृपावंत होऊन, प्रस्तुत श्री जेजुरी येथील तळ्यावर येऊन, दोन पायली सराटे आसनास घालून, अनुष्ठानास बसलेत आहां. जेव्हां पर्जन्य पडेल तेव्हां गोमूत्र घेईन असा निश्चय केला आहे इ० इ० " उल्लेख आहे. व लेखांक १८१ ह्या पिलाजी जाधवरावाच्या पत्रांत “गतवर्षी भुलोबांजवळ पाउसा- करितां बैसलों. देवानें पाऊस दिल्हा. तरी स्वामींच्या चित्तांत पाऊस पडावा अर्से आलें, तेव्हां श्री भुलोबांसही संकट पडलें. ते गोष्टीचें अपूर्व नाहीं.” असा उल्लेख आहे. ही गोष्ट ३० स० १७३८ सालची असावी. ह्या दोन्ही गोष्टींच्या सत्यासत्यासंबंधानें चर्चा करण्याची अवश्यकता नाहीं. ह्यावरून इतकेंच सिद्ध होतें कीं, स्वामींच्या वेळचे लोक अतिशय भक्तिभोळे असत व त्यांची स्वामींवर पराकाष्ठेची निष्ठा असे. त्यामुळे त्यांना अशा अलौ- किक कृति आचरून त्यांचें समाधान करणे भाग पडे. १ लोकांच्या समजुती व मर्ते जशी असतील त्यांस अनुसरून वागण्याचा कल पूर्वीच्या सत्पुरुषांचा असावा असे दिसतें. त्यामुळे लोकांचा भाव वाढून त्यांच्या हातून महत्कार्ये घडत असत. ह्यावरून असल्या चमत्कारांचा उगम