पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ तह" ह्या आपल्या लेखामध्यें असे लिहिलं आहे कीं "शाहु महाराज, पेशवे व इतर प्रमुख मराठे सरदार हे व ज्यांच्या सल्लामसलतीची मराठे दरबारांत अत्यंत चहा होती असे योगी लोक, ह्या सर्वांच्या मतें, इंग्रज लोक हे स्वराज्याचे हि- तचिंतक असून, त्यांना सन्मान देणे अत्यंत अवश्यक आहे असें होतें.” क्या- टन गार्डन नांवाचा इंग्रजांचा एक वकील इ० स० १७३९ च्या जून महिन्यांत शाहु महाराजांच्या भेटीस आला होता. त्यानें महाराजांचा दरबारांतील राग- रंग व अंतस्थ प्रकार ह्या सर्वोचें सूक्ष्म दृष्टीनें निरीक्षण करून मुंबईच्या गव्ह रनरास सर्व वृत्त निवेदन केले आहे. त्यांत शाहु महाराजांचे इंग्रजाविषयीं स्नेहभावदर्शक उद्गार व्यक्त केले आहेत. त्यांतील सारांश, “इंग्रज लोक हे सालस आणि निरुपद्रवी असून त्यांना व्यापारवृद्धीची इच्छा आहे. त्यांनी आपल्या धर्माच्या आचरणामध्ये एकास देखील पीडा दिलेली नाहीं. तेव्हां त्यांच्याशीं स्रेहसंबंध ठेवल्यानें नवीन जिंकलेल्या मुलुखाची भरभराटच होईल.” असा आहे. अर्थात् अशा लोकांविषयीं महाराष्ट्रधर्माचं व राज्याचें अभीष्ट चिंत- Dine राजमान्य योगी ब्रह्मद्रस्वामी हे स्नेहभाव बाळगतील ह्यांत नवल नाहीं. स्वामींच्या व इंग्रजांच्या स्नेहसंबंधाचे चांगले आविष्करण होण्यास आणखी कांहीं अस्सल कागदपत्र सांपडले पाहिजेत, ह्मणजे फार बहार होईल. • the opinion that the English were a blessing to the country, and ought to be respected." ह्यांत योगी हा शब्द अनेकवचनी योजिला आहे. परंतु स्वामींसारखे योगी किती आहेत ह्याची कल्पना त्या वेळच्या इंग्रज लोकांस असण्याचा संभव नस- ल्यामुळे तसे त्यांनी लिहिले असावें. परंतु ज्यांच्या शब्दास सर्व लोक मान देत असत असे योगी ह्मणजे ब्रह्मंद्रस्वामी हेच होत, असे सर्व मराठी कागद- पत्रांवरून सिद्ध होतें. "On the 27th the Raja.......... observed by saying we were a good and peaceable people, desirous of commerce, molested none in the exercise of their religions, and that preserving our friendship would highly contribute to the prosperity of their late conquest." - Gordons' letter, English Embassy to the Maráttàs.