पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० रावल कोंपनी फोर्त बम्बई वाके हेंदुस्थान या पार्सीया आरवस्तान या व अमल मैं जंजीरे मुंबै सलाम सलामत अंजयाम आंमी येथील खैरियत जाणून मोहिवीं आपली खैरआफियत हमेशा मरकुम फरमाऊन शादमानी हांसिल केली पाहिजे. दिगर, मोहिबांकडील कितावती ३ तीन नेकसात येऊन पोंचल्या. मोहिबांची खुष खबरी रुएदाद आयां होऊन बहूतसी खुषी हांसिल जाली. मौजे अलिबागेहून कूच करून मजलदरमजल घांटावर गेले. व आजम कपितान इंच- बर्ड व इञ्चत आसार कृष्णाजी राम यांचे मूंजबानीवर होवे ह्मणून तर मशा- रनिल्हे येऊन बिलफल मूंजबानी आयां केलें. त्याजवरून इजहार झाले व मोहिबांच्या फत्तेनसरतीच्या कित्येक खबरा कलमी केल्या. त्या मालूम होऊन खुपवक्त झालो. व डाख्तर सांडी यांस रवाना करणे ह्मणून कलमीं केलें. ऐशियास बरसात काल असे; आणि बंदर मजकुरीं अजारी बहूत. याकरितां मशारनिलेस यावयास माफगत होत नसे. व ईजानेवास मालुम होऊन आले कीं मशारनिले कृष्णाजी राम यांस मोहिनीं येथे ठेवलें. सबब कीं, ईजानिबाचे कर्तव्याची पाळत करून घ्यावी ह्मणून. हाल्हीं शारनिलेस मोहिबांचे नजीक पाठवून दिला असे. अम्मा यावरून तर्फेनची दोस्ती तमाम झाली असें नसे. सबब की ईंजानीव हरयेक मोहिबांची प्यार खिदमत चाहत असत. ज्यादा काय लिहिणें ? र॥ छ २३ मोहोरम हे किताबती. ता॥ जून सन १७३५ इंग्रजी. हे किताबती.” ह्या पत्रावरून पेशव्यांचे व इंग्रजांचे पत्रव्यवहार व त्यांची राजकारणे स्वामींस अवगत होतीं हैं सिद्ध होते. शाहु महाराजांच्या राजदरबारांत स्वामींचें वर्चस्व होतें, ही गोष्ट इंग्रजांसही माहीत असावी असे वाटतें. ह्या वेळीं इंग्रज लोक केवळ व्यापारी ह्या नात्याने हिंदुस्थानांत वास करीत असल्यामुळे त्यांच्या विषयीं शाहु महाराजांस किंवा ब्रह्मद्रस्वामींस प्रतिकूल मत बाळगण्याचें कांहीं कारण नव्हते. मि० अंडरसन ह्यांनी “पश्चिमप्रांतांतील पहिल्या लढाया व १ मि० अंडरसन ह्यांचे मूळ वाक्य येणेप्रमाणे आहे:- “The Raja, Peishwa, principal Chiefs, and especially the Yogees, whose advice was then highly esteemed, coincided in -