पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ कांहीं होत नाहीं. बाणगंगेच्या पुलाचा मजकूर लिहिला, तर स्वामी समर्थ आहेत. जैसें कळेल तैसें फलटणी उदकाची समृद्धि होय ऐसें केले पाहिजे. येविसीं पूर्वी एक दोन वेळां स्वामींस पत्र लिहिलेच होतें. तर आतांही विनंति- पत्र सूचनेसाठी लिहिले असे बहुत काय लिहिणें? कृपा निरंतर असों दिली पाहिजे हे विनंति.” ह्या एका पत्रावरून स्वामींचा व महाराष्ट्रस्त्रियांचा संबंध कोणत्या सत्कारणा- प्रीत्यर्थ होता है चांगलें व्यक्त होतें. ह्या सर्व स्त्रिया स्वामींस राजकारणाच्या गोष्टी कळवीत असत; युद्धवाती निवेदन करीत असत; आपल्या मुलाबाळांस ह्यांचा आशीर्वाद घेत असत; आणि त्यांच्या कृपाप्रसादानें आपणांस कृतकृत्य मानीत असत. हा सर्व इतिहास फार मौजेचा आहे. त्या योगानें महाराष्ट्र- स्त्रियांची योग्यता व बहुगुणसंपन्नता अधिक प्रदर्शित होऊन, स्वराष्ट्राच्या अभ्यु- दयास त्यांची उत्कृष्ट मदत झाल्याचे दिसून येणार आहे. इंग्रजांचा व स्वामींचा स्नेहभाव. , इंग्रजांविषयी ब्रह्मद्रस्वामींचें फार चांगले मत असून त्यांच्याशी त्यांचा स्त्रे- हभाव होता असे दिसतें. मराठे व हवशी ह्यांची लढाई चालली असतांना इंग्रजांचा व आपला स्नेह आहे असे सांगून ते त्यांच्या भेटीकरितां मुंबईस जाण्यासही तयार झाले होते, असें लेखांक ९ ह्यावरून उघड होतें. इंग्र जांचा व स्वामींचा प्रत्यक्ष पत्रव्यवहार अद्यापि उपलब्ध झाला नाहीं; तथापि इंग्रजांच्या व पेशव्यांच्या राज्यकारस्थानांची पत्रे स्वामींकडे येत असावीत व सर्व गोष्टी त्यांच्या अनुमतानें होत असाव्यात असा तर्क करण्यास आधार सांपडतो. मुंबईचे गव्हरनर जॉन हॉर्न ह्यांनी बाजीरावांस लिहिलेले ३० स० १७३५ सालचें एक पत्र स्वामींच्या कागदपत्रांत सांपडले आहे. तें येणेप्रमाणेः- - “आजम बाजीराऊ पंडित प्रधान दाम महब्बतहूः- - रफअत व अवालिपन्हा शोकत व हशमत्दस्तगाह ऐंतजाद दोस्तान् अजदिल् एखलास जॉन हॉर्न निया ) पातशाही इंग्रेजान गोवर्नदोर जनरल वालाजाः बरतानिया (ब्रिटा- साहेबी थोर अखतियार हशमतपन्हा दस्तगाह आन-