पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ बरें. ह्यावरून राष्ट्रोद्धार करण्याकरितां अवतीर्ण झालेल्या पुरुषांच्या ठिकाणीं जातिभेदादि क्षुद्र विचारांचा गंधही नसून, तेथें शुद्ध प्रेमभाव व सर्वाविषयीं पूर्ण सहानुभूति कशी बाणलेली असते हें शिकण्यासारखें आहे. स्त्रियांचा राजकारणांत प्रवेश. स्वामींच्या चरित्रांत अत्यंत महत्वाची गोष्ट ही निर्दशनास येते कीं, शाहु महाराजांच्या राण्या सखवारबाई, सगुणाबाई आणि विरूवाई ह्यांचा व इतर प्रमुख मराठे सरदारांच्या स्त्रियांचा राजकारणांत चांगला प्रवेश होता. सर्व महाराष्ट्र सरदारांच्या स्त्रियांशीं स्वामींचा पत्रव्यवहार चालत असे व त्यांचें त्यांचे चांगले दळणवळण असे. ह्या स्त्रिया फार चतुर व राजकारणी असत. त्यांच्या मार्फत स्वामी आपलीं सर्व इच्छित कार्ये करून घेत असत. आंग्याच्या स्त्रिया मथुराबाई व लिंबाई, होळकराची पत्नी गौतमाबाई, दाभाड्याची उमा- बाई, पेशव्यांची राधाबाई, ह्यांची पत्रे उपलब्ध झाली आहेत. तेव्हां त्याबद्दल अधिक विस्तृत माहिती देण्याची आवश्यकता नाहीं. परंतु राजसबाई निंवा- ळकर हिचे एक पत्र उपलब्ध झाले आहे. तें येथें सादर करितों. “तीर्थरूप महाराज राजश्री परमहंसवावा वडिलांचे सेवेसी:- बालकें सौ• राजसबाई चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष तुझीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वर्तमान विदित जाहालें. 'संकार' नाम याचा मजकूर लिहिला. सविस्तर अवगत जाहला. त्याचें पारिपत्य स्वामी वेगळें - १ विरूबाईचे छत्रपतींच्या दरबारांत चांगलेच वर्चस्व होतें हैं तत्कालीन पुराव्यानें सिद्ध होतें. इंग्रज लोकांनीं शाहूची मर्जी प्रसन्न करण्याकरितां तिला नजरनजराणे पाठविले होते. क्याप्टन गॉर्डन ह्मणून जो त्यांचा वकील छत्रपतींस भेटण्याकरितां गेला होता त्याने तिचें दर्शन घेण्याचाही यत्न केला होता. परंतु तो सफल झाला नाहीं. त्यानें त्याबद्दल पुढील उल्लेख केला आहे:- " As we could not see Virubai, a woman of consequence, we sent her letters and present. She gave & civil profession in return." २ 'स' या अक्षरानें प्रारंभ होणारे कोणाचें तरी सांकेतिक नांव आहे.