पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ पर्यंत कोंकणांत श्रीस्थळीं समाधीस जात असत व पुढेही दोन तीन वेळां तिकडे गेले होते. त्या वेळीं हवशांच्या व त्यांच्या भेटी झाल्याचे व परस्परांस नजरनजराणे पाठविण्याचे उल्लेख दृष्टीस पडतात. राजकारणानिमित्त मराठ्यांचे व हवशांचे इतके विग्रह झाले, तथापि त्या घराण्याचा व स्वामींचा स्नेहसंबंध कधींही तुटला नाहीं. जंजिरेकर हवशी ह्यांनीं स्वामींस ३० स० १७४३ सालीं पेढें व आंबडस वगैरे गांवच्या पुनः सनदा करून दिल्या आहेत. त्यांतही स्वामींच्या स्नेहाचा उल्लेख आहे. ह्यावरून मुसलमान लोकांची हिंदु सा- धूच्या ठायीं पूर्वी कशी भक्ति असे हे चांगले दिसून येतें, व स्वामींच्या ठिकाणीं खरें साधुत्व असल्याची साक्ष पटते. राजकीय दृष्टीचे सर्व विकल्प व सर्व वि- कृति एकीकडे ठेवून, सर्वत्र प्रेम बाळगण्यास व समत्व ठेवण्यास मन किती सुसंस्कृत व किती प्रगल्भ असले पाहिजे ह्याची कल्पना वाचकांनी करावी हें १ हबशांनीं छ साबान हिजरी सन १९५६ झणजे ता० १२ सप्टंबर इ० स० १७४३ रोजीं स्वामींस दिलेल्या दोन सनदा धावडशीदप्तरांत सांपडल्या आहेत. त्यांपैकी एक पेढें व दुसरी आंबडस ह्या गांवांबद्दल आहे. दोहींचा मजकूर एकच आहे. ह्याकरितां त्यांतील एक येथे सादर करितों:- ( फारसी शिका.) “देशाधिकारी वर्तमान भावी व देशमुख व देशपांडे व जमेदार व रयान तर्फ चिपळून मामले आमदाबाद सुभे आमाल बंदर मयमुन मुस्ताफाबाद ऊर्फ दाभोळ सरकार तळ कोंकण आदिलखानी मीनमजाफ सुभे दारुलजफर बिजापूर तालुके किले महरुसे जंजिरे दंडाराजपुरी यांणीं समजावें. सुरुसन आ आर्बेन मया व आलफ. पूर्वी इकडे हरिभक्तिपरायण ब्रोंद्र गोसावी संस्थान परशराम यांस मौजे पेढें तर्फ मजकूर हा गांव पेशजी वालिजामी खानवालापान बेहप्त मकान साहेब यांणीं इनाम देऊन चालवीत होते. अलीकडे दुतर्फी अंमलाचे गर्गशामुळे भोगवटा राहिला होता. परंतु हलीं मनास आणितां गोसावी मशारनिल्हे हे पूर्वीपासून या घराण्याचें कल्याण चिंतून अति नेइ चालवीत आहेत, आणि पुढेही हीच इच्छा ठेवून निरंतर दौलत रहावी असा आशीर्वाद देत आहेत, याकरितां नवस सिद्धीस न्यावा ह्मणोन मौजे मजकूर मशारनिल्हेस पूर्वीप्रमाणें हल्लीं इनाम बक्षीस करून दिल्हा असे. इ० " -