पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वामींची समदृष्टि व सर्वांभूतीं प्रेम. ● स्वामींच्या उपलब्ध झालेल्या पत्रव्यवहारावरून त्यांची सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या लोकांविषयीं समदृष्टि व प्रेमबुद्धि असल्याचें दिसून येतें. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारचा भेदभाव त्यांच्या वर्तनांत केव्हांही दिसत नाहीं. जातिभेद किंवा वर्णभेद यांसारखे क्षुद्रविचार एकीकडे ठेवून सर्वराष्ट्राचें एकीकरण व समुन्नति करण्याकडे स्वामींचें सर्व धोरण दिसतें. त्यांच्या सर्व पत्रांचें लक्षपूर्वक मनन केले तर त्यांत कोठेंही तिळमात्र देखील भेदभाव आढ ळत नाहीं. बाजीरावाविषयीं जें प्रेम तेंच प्रेम मल्हारराव होळकराविषयींही दृष्टीस पडते. त्यांत पात्रापात्र व योग्यायोग्य हा विचार होता; परंतु जातिभे दाचा किंवा धर्मभेदाचा त्यास गंधही नव्हता. हिंदुधर्माचें संरक्षण व स्वरा- ज्याचा विस्तार हें स्वामींचें बीद असल्यामुळे त्या कार्यात जे आड येत त्यांचा प्रतिकार करणें राजकीयदृष्टीने त्यांस अवश्यक होतें. तेव्हां त्याबद्दल त्यांनीं ने यत्न केले त्यांचा विचार आलाहिदा आहे. परंतु जे हिंदुधर्मास त्रास देत नसत, त्यांच्याविषयीं स्वामींच्या ठिकाणी प्रेमभाव वसत असे. खुद्द स्वामीं जवळ सुलतानभाई नांवाचा मुसलमान नौकर असे. त्याजवर त्यांचा जीव कीं प्राण असे. जंजिऱ्याचे हवशी सिद्दी याकूदखान हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. त्यांनी स्वामींच्या देवस्थानास दोन इनाम गांवें दिलीं होतीं, हें मागें सांगितलेंच आहे. खुद्द स्वामींचें कोणत्याही व्यक्तीशीं खाजगी वैर नसे. एव- ढंच नव्हे पण प्रत्यक्ष शत्रूशीं देखील त्यांचा स्नेहभाव असे. सिद्दी सात, सिद्दी संधूल वगैरे हबशी लोक हिंदुधर्माचे कट्टे शत्रू, पण त्यांचा व स्वामींचा पत्रव्यवहार चालत होता. स्वामी घांटावर आल्यानंतर हबशी लोकांनी त्यांना आपल्या राज्यांत श्री परशुराम येथे नेण्याबद्दल पुष्कळ खटपट केल्याचे दिसून येतें. (लेखांक २४०४१।४२।४३ पहा). अर्थात् हिंदुधर्माचा द्वेष करणाऱ्या हवशी लोकांनीं देखील स्वामीविषयीं पूज्यबुद्धि व भक्तिभाव दाखवावा, हें स्वामींच्या योग्यतेचें लक्षण समजले पाहिजे व त्याबद्दल हबशांचेंही अभिनंदन केलें पा हिजे. स्वामींचा व हबशांचा राजकीय बाबतींत कितीही बेबनाव झाला, तरी त्यांच्यामध्यें घरोन्याचा पत्रव्यवहार व प्रेमाच्या नजरा अखेरपर्यंत चालत असत. स्वामी ३० स० १७२८ मध्ये धावडशीस आले, तथापि ते ३० स० १७३२ ●