पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहवत नाहीं. शिवाजीमहाराजांच्या वेळेस रामदासस्वामींनीं जें कार्य केलें, तेंच कार्य शाहू व बाजीराव ह्यांच्या कारकीर्दीत ब्रह्मद्रस्वामींनीं केलें, असें ह्मण- ण्यास कोणतीच हरकत नाहीं. परंतु इतिहासाच्या अभावामुळे ह्या लोकोत्तर राजकारणी सत्पुरुषाचं चरित्र व त्याच्या सत्कृतींची हकीकत अद्यापि लोकप्रसिद्ध झाली नाहीं, ही दुःखाची गोष्ट होय ! ● रामदासस्वामी व ब्रह्मद्रस्वामी ह्यांच्या चरित्रांचें अवलोकन केले, तर मरा ठ्यांच्या इतिहासांत धर्माचं वर्चस्व राजावर विशेष असून, त्याच्याच जोरानें साम्रा- ज्यसंस्थापना किंवा राष्ट्राभ्युदय अशा महनीय गोष्टी घडून येत असत असें दिसून येते. हिंदुस्थानांत फार प्राचीनकालापासून 'ब्राह्मण' व 'क्षत्रिय' ह्या द्वयीची एकात्मकता असून पहिल्याने धर्मोपदेश करावा, व दुसऱ्यानें धर्मरक्षण करावें, असा गुणकर्मविभागशः नियम चालत आल्यामुळे, ब्राह्मणाचें ह्मणजे धर्मोप देशकाचे प्राधान्य क्षत्रियावर ह्मणजे राजावर विशेष असावें, है साहाजिक आहे. त्यामुळेच क्षत्रियाचे कुलगुरुत्व किंवा धर्मोपदेशकत्व ब्राह्मणाकडे जाऊन, त्याच्या मंत्रोपदेशानें चालण्याची प्रवृत्ति क्षत्रियानें स्वीकारली. त्यामुळे धर्माचा पगडा राजावर बसून, ज्याप्रमाणे शरीराच्या चलनवलनादि किया बरोबर चालण्यास जीवनशक्तीची आवश्यकता असते, त्याप्रमाणे राज्यव्यवहार चालण्यास धर्माचीही आवश्यकता उत्पन्न झाली. अर्थात् धर्माच्या अनुषंगानें राज्य चालविण्याचा हिंदु राजांचा बाणा असल्यामुळे, त्यांच्या राज्यास 'धर्माचें राज्य' किंवा 'धर्म- राज्य ' असें अभिधान प्राप्त झाले. अर्थात् 'धर्म' व 'राज्य' ह्यांचा हिंदुस्थानांत 'जीव' आणि 'शरीर' असा अन्योन्य संबंध जुळल्यामुळे, 'ब्राह्मण' व 'क्षत्रिय' ह्यांची एकात्मकता असावी है अगदर्दी साहाजिक आहे. त्यामुळे हिंदुस्थानांतील 'धर्म' व 'राज्य' ह्यांचं म्हणजे पर्यायेंकरून ब्राह्मण व क्षत्रिय ह्यांचें तादात्म्य होऊन, त्यांच्यामध्ये अन्योन्य भक्ति व प्रेम दाखविणारी गुरुशिष्य संस्था निर्माण झाली. दशरथाचा वसिष्ठ, रामचंद्राचा विश्वामित्र, धर्मराजाचा धौम्य ह्या क्ष- त्रियांच्या कुलगुरूंची माहिती रामायण, महाभारत इत्यादि ग्रंथांत प्रसिद्ध आहे. ही कुलगुरूंची परंपरा हिंदुस्थानांतील प्रत्येक धर्मराज्यांत दृष्टीस पडते. विजय- नगरच्या हिंदु साम्राज्याचे संस्थापक बुकराय व हकराय ह्यांचे गुरु सुप्रसिद्ध विद्यारण्यस्वामी हे होते. दक्षिणेतील प्रख्यात विष्णुवर्धन राजाचे गुरु विशिष्टा