पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ - “श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव भक्तराज संभाजी शिंदे नामजाद किल्ले रसाळगड यांसी आज्ञा केली ऐसीजेः- तुझीं तानाजी संकपाळ याजबरोबर पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. वाघांबर आणखी यल करून पाठविलें ह्मणून लिहिलें, तें प्रविष्ट जाहलें. सतरा नखे आहेत. तीन नखें नाहींत. याजउपरी यल होईल तर बच्चा वाघ डाहाणा यांचे वाघांबर आणखी मिळेल तर उत्तम आहे. अंतोजीनें मेहनती केली, तरी हल्लीं डाहाणा पटाईत ह्याचा यत्न जाला तरी घेऊन त्यास पाठविणे मेहनत श्री सार्थक क रील. केवळ माणूस जाया होऊन वाघांबर आणावें ऐसें नाहीं. वाघांबर मा- णूस जाया न होतां अनायास हातास आलें तर पाठविले पाहिजे. विशेष काय लिहिणें. मध पाठविला तो पावला. सुसीचा तागा पाठविलेप्रमाणे पावला. बहुत शहाणपणें धंदा करीत असिले पाहिजे. विशेष लिहिणें तरी आपण सुज्ञ आहेत. आंबोला घांटांत गाढव खडकाजवळ बैल पडतात. त्यास तेथें दोघे पाथरवट व चार माणसें पाठवून मार्ग नीट करणें. त्यांचा महिना होईल तो सांगोन पाठविणे. आह्मी देऊं गई न करणें. तुझांस प्रसाद गोडांब्या पाठ- विल्या आहेत. घेतल्या पाहिजेत. हे आज्ञा. " • स्वामींचें सार्वजनिक कामावर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम होते असा त्यांचा एका पत्रांत उल्लेख सांपडतो. ते पत्र येणेप्रमाणे:- - “श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं:- - सहस्रायु चिरंजीव रघुजी घाटगे हवालदार व सेखोजी नलवडे सरनोबत व सबनीस किल्ले संतोषगड यांसी आज्ञा केली ऐसी जेः— कोणास पोटचीं लॅकरें असतात. आमचीं लेंकरें हे कारखाने तुमचे देवानें मोठेंस वाईट केलें !! कारखाना तेथें आहे. त्याचा हरएक बाबें सांभाळ करीत जाणें. विहिरीपा- सील ओढा किल्ल्याचे लोक व गांवचे लोक देऊन खणोन टाकवणें बहुत काय लिहिणें हे आज्ञा." - ह्या सर्व गोष्टींवरून स्वामींचें अंतःकरण किती लोकहिततत्पर होतें ह्याचा बरोबर अंदाज करितां येतो; व त्यांची परोपकृति पाहून मन थक होऊन जातं.