पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ ५०० गणपतीचें देवालय ५०० श्री एकवीर ५०० श्री काळकाई १००००० तलाव त्रिपुरी ४७००० पुण्याचे वाटेस २२१०० १००००० श्री मेरुलिंग नजीक धावडशी डोंगरावर देवालय, कोट व तलाव १००००० महादेवाचे देवालय जीर्णोद्धार ५०० समाधीची जागा ४५००० खांबटकीचा घाट ३२००० विहीर अंधारवाडी १००५०० २०००० गणपतीचें देवालय राजुरी ७०००० विहिरी मौजे माळशिरस ८००० बारव पांवस ७००० बारव कुरकुंभ ४००० विहीर येवत १०००० देवालय मौजे गोठणें ता० राजापूर ४७००० ● ह्या सर्व इमारतींच्या खर्चाची संख्या ८८४५०० रुपये आहे. ह्याशिवाय आणखी ४३००० रुपयांचीं जागोजाग विहिरींची लहान लहान कामें केलेलीं आहेत. ज्या कामांचे हिशोब सांपडले आहेत त्यांचा खर्च ९२७५०० रुपये इतका आहे. ह्या शिवाय स्वामींनीं आणखी सार्वजनिक उपयोगाचीं कामें बहुत केलीं आहेत. ह्या सर्व कामांत स्वामींची परोपकारबुद्धि व सत्कारणी व्यय दिसून येतो. गांवोगांव विहिरी व तलाव बांधून लोकांना जलदान द्यावयाचें पुण्य- कृत्य स्वामींनीं समाधि घेईपर्यंत एकसारखें चालविलें होतें. लोकांच्या जाण्यायेण्यास अडचण पडूं नये म्हणून नद्यांस पूल व डोंगरांतून घांट बांधण्याचें कामही स्वामींनी करण्याचें योजिलें होतें. लेखांक २१६ व २६३ या पत्रां- वरून नीरा नदीवर लोकांच्या सोयीसाठीं पूल बांधण्याकरितां स्वामींनीं विरुबाई व प्रतिनिधि ह्यांचे मार्फत शाहु महाराजांकडे खटपट चालविल्याचे दिसतें. परंतु तो बेत सिद्धीस गेला नाहीं. प्रवासीजनांच्या सुखाकरितां डोंगराचे घांट बांधून उत्तम रस्ते तयार करण्याचाही स्वामींचा यत्न होता. पुण्याच्या रस्त्यावर स्वांबटकीचा घांट स्वामींनी बांधवून काढला. त्याचप्रमाणे इतर ठिकाणचेही घांट बांधवून काढण्याकडे त्यांचें लक्ष असल्याचे दिसून येतें. संभाजी शिंदे ह्यास लिहिलेल्या एका पत्रांत आंबोला घांटांतील गाढव खडक दुरुस्त करण्या बद्दल स्वामींची आज्ञा दृष्टीस पडते. हे पत्र येणेप्रमाणेः- -