पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ ह्यावरून स्वामींची भिक्षा फक्त छत्रपति, पेशवे व कांहीं मराठे सरदार ह्यांची मिळून प्रतिवर्षी १५८३३ रुपये ठरीव होती. ह्याशिवाय जे समयीं खासा स्वारी भिक्षेस जाई, त्या वेळीं ज्यास जें अनुकूल पडे तें तो देत असे. वर्षास- नाचीं करारपत्रे पेशव्यांवांचून कोणाचींच नाहींत. पेशव्यांचें करारपत्र बाळाजी बाजीरावांनी मात्र दिलेले आहे. (लेखांक १५६ पहा). स्वामींवर सर्वोची भक्ति असल्यामुळे त्यांस कधीं कोणी विन्मुख दवडीत नसत. स्वामींनी ह्या द्रव्याचा विनियोग देवालयें, विहिरी, तलाव वगैरे बांधण्यांत, गरिबांना अन्नदान देण्यांत, आणि छत्रपति, पेशवे व इतर मराठे सरदार ह्यांना अडचणीच्या प्रसंगी कर्ज देण्यांत केला. ह्यांपैकी कर्जाचा पैसा सव्याज वसूल होत असे. व कित्येक वेळां बुडतही असे. स्वामींनी आपल्या कारकीर्दीत लाखो रुपये खर्च केले व देवालयें वगैरे बांधिलीं, तरी त्यांच्या निधनसमयीं त्यांच्या जवळ १६०६३७।।। | रुपये शिलक होती. ह्यापैकी ऐन शिलक ५७१०८||८| रुपये व बाकी निसबतवार लोकांकडे कर्जाऊ १०३५२९४३ इतके रुपये होती. ह्या वरून 'भिक्षापति तो लक्षापति' ही ह्मण स्वामींस यथार्थ लागू पडते असें कोण ह्मणणार नाहीं? स्वामींचीं सार्वजनिक कामें. स्वामींनी भिक्षाद्रव्य गोळा करून लोकोपयोगार्थ अनेक देवालयें, तलाव, विहिरी वगैरे बांधिल्या. त्यांपैकी मुख्य मुख्य कामांची यादी सांपडली आहे. ती येणेंप्रमाणेंः— १००००० श्री परशुराम वास्तव्य पेढें २२१००० धावडशी येथील कामें २००००० मुख्य समाधि ५००० वाघजाईचें देवालय ५००० मारुतीचें देवालय १०००० वाड्याचा कोट ५०० श्री जनीचें देवालय ३०००० तलाव धावडशी ३०००० तलाव गणेशखिंड नजीक पाल ४०००० तलाव इंदापूर १०००० तलाव नातेपुतें ५०००० श्री रामेश्वर कृष्णातीर नजीक मरदें देवालय १००५०० श्री भुलेश्वर नजीक मा- ळशिरस