पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ कीर्दीत धावडशी येथें नेहमीं राजदरबारासारखा थाट चालत असून, तेथे ‘नित्य श्री नित्य मंगलम्' ह्या म्हणीची सार्थकता दृष्टीस पडत असे. स्वामींची भिक्षा. स्वामी प्रत्येकास श्रीचा वरप्रसाद देऊन व त्याचे कल्याण करून त्याज- कडून देवाची भिक्षा घेत असत. स्वामींच्या आशीर्वचनांचा प्रभाव कांहीं लोकोत्तर असल्यामुळे लोकांस तीं भद्रकर वाटून, ते मोठ्या भक्तिभावानें तीं प्राप्त करून घेत असत; व स्वामींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या देवस्थानास द्रव्य देत असत. स्वामींच्या आशीर्वादाचा लाभ घेतला नाहीं असा एकही मराठा सरदार सांपडणे कठीण आहे. किंबहुना, त्यांच्या आशीर्वादानें सर्व महारा- ष्ट्रमंडळ व्यापिलें होतें असें ह्मटले असतां अतिशयोक्ति होणार नाहीं. स्वामींच्या भिक्षेचा उल्लेख सर्व सरदारांच्या पत्रांत कमजास्त प्रमाणानें सांपडतो. तथापि कांहीं प्रमुख सरदारांकडे त्यांची वर्षासनें ठरलीं होतीं. त्यांची एक यादी सांपडली आहे. ती येणेप्रमाणेः- - श्रीभार्गवराम. यादी वर्षासनें श्रीस्वामी संस्थान धावडसी. श्रीस्वामींचे कारकीर्दीत पावत आले:- - ६१०० श्रीमंत कै० नाना यांणी करार करून दिले. १००० राजश्री महादाजी अंबाजी तीन वर्षांनीं सहस्र रुपये द्यावे. ३००० महाराज छत्रपतींकडील वर्षासन. ५००० रा० होळकर तीन सालांनीं. १२०० रा० जाधव तीन सालांनीं. १५०० रा० फत्तेसिंग भोंसले. ५००० रा० शिंदे तीन सालां. ५००० रा० पवार तीन सालां. १००० आनंदराव वकील (सुमंत) तिसालां. १००० नारवा शेणवी (मंत्री) ५०० राणोजी डुवल. ५०० रत्नाकरपंत. 23 " "