पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ जात असत व स्वामींचा प्रसाद भक्षण करून स्वतःस पुनीत मानीत असत. स्वा मींच्या कोठीचे २०० बैल कोंकणांत जाऊन तिकडून सामान आणीत असत. त्यांना सर्व राज्यांत जकात माफ असे. अशीं माफीचीं दस्तकें पुष्कळ सांपडलीं आहेत. निरनिराळ्या वस्तूंचा संग्रह करण्याच्या कामीं स्वामी फारच दक्ष अ- सत. केशर, कृष्णागर, चंदन व अष्टगंध वगैरे परिमल द्रव्यें त्यांच्या पूजेस नेहमीं लागत. त्यांचा संग्रह त्यांच्याजवळ अतिशय असे. त्याचप्रमाणे हेमगर्भ, नारायणतेल वगैरे मात्रा व इतर औषधें ह्यांचाही स्वामींजवळ संचय असे. उत्तम मध ते घागरीच्या घागरी जमवून लोकांस वांटीत असत. तसेंच भरजरी शालजोड्या, बादली मंदिल, चांदणी दुपेटे, अष्टगोली शेले, उंची ताफते, व तलम मखमली इत्यादि परोपरीची उंची वस्त्रे त्यांच्या संग्रहास विपुल असत तीं भेटीच्या समयीं ते सरदार लोकांस अर्पण करीत असत. ह्या सर्व जिनसा स्वामी आपल्या भक्तवृंदांकडून जमवीत असत व तत्प्रीत्यर्थ केव्हां केव्हां ते रुष्टही होत असत. १०३ ब १/४२ स्वामी दररोज समाधि घेत नसत. प्रतिवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदेस ते कृष्णातीरीं समाधि घेत असत, व एक महिना एकांतस्थानीं राहून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस समाधि विसर्जन करून बाहेर येत तेव्हां त्यांचा सत्कार करण्यास शाहु महाराज व त्यांचे सरदार जात असत. ह्या वेळीं धावडशी येथें मंगलोत्सव होत असे. तत्प्रीत्यर्थ छत्रपतींकडून हत्ती, घोडे, निशाणें, भालदार, चोपदार, नगारे, वाजंत्री, वगैरे सर्व सरंजाम जात असे. नंतर मोठ्या समारंभेकरून यतिमहाराजांस पालखींत घालून धावडशीस आणीत असत. तेथें मग हरिकीर्तन, अन्नसंतर्पण, वगैरें होत असे. छत्रपतीकडून व पेशव्यांकडून गणेशचतुर्थीस बहुमूल्य वस्खें व गुरुद- क्षिणा निराळी येत असे. स्वामींच्या ह्या प्रतिवार्षिक महोत्सवास प्रचंड जनसमु दाय जमत असे. ह्यावरून स्वामींचा हा समाधिविसर्जनसमारंभ महाराष्ट्रांत संघशक्तीचे बीजारोपण करण्यास कसा कारणीभूत झाला ह्याची कल्पना करितां येईल. स्वामींच्या ह्या अलौकिक कृतीमुळे त्यांचा कीर्तिमहिमा सर्वत्र पसरून ते सर्वोचा दर्शनहेतु होऊन राहिले. त्यामुळे, कवि मोरोपंतांनीं ह्मटल्याप्रमाणे मोठे मोठेहि मठद्वारांतुनि भेटि घेति पायांची ॥ असा प्रकार धावडशीस नित्यशः दृष्टीस पडत असे. तात्पर्य, स्वामींच्या कार २१edTM वर्ग ७