पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० मागितल्याचा उल्लेख आहे. ह्यावरून हे स्वामीमहाराज नुसती जपमाळ घेऊन जप करणारांपैकी नसून, स्वराज्य व स्वधर्म ह्यांच्या अभिवृद्धयर्थ लढणाऱ्या यो- द्धयास शस्त्रांचाही प्रसाद देत असल्याचे दिसून येतें. मराठा वीर सज्ज होऊन रणसंग्रामास निघाला ह्मणजे तो प्रथम स्वामींची भेट घेत असे. त्या वेळीं हे राज- कारणी सत्पुरुष त्यास, शुभदायक असें उंची वस्त्र, त्याबरोबर एखादें उत्तम शस्त्र, आणि आपला प्रेमपूर्ण आशीर्वाद हीं अर्पण करीत असत. स्वामींचें प्रसादवस्त्र मिळालें ह्मणजे तें 'वज्रकवच' असे समजून, स्त्रशरीरसंरक्षणार्थ तो एकनिष्ठ वीर धारण करीत असे; आणि रणांगणामध्ये जाऊन व शत्रूशीं झुंजून, विजयी होत्साता पुनः स्वामींच्या दर्शनास परत येत असे. लेखांक ७७ ह्या पत्रांत "तुह्मांस वज्रकवच पाठविले आहे. स्वारीशिकारीस अंगीं घालीत जाणे” असें सदा- शिव चिमणाजीस स्वामींनी लिहिले आहे. त्याचप्रमाणे लेखांक २८९ ह्यांत मल्हारराव होळकरास पांढरी सकलाद पाठवून हें 'वज्रकवच' अंगावर घेत जाणे ह्मणून स्वामींनीं आज्ञा केली आहे. ह्या सर्व उदाहरणांवरून स्वामींची मूर्ति फारच चतुर होती असे ह्मणणे भाग पडतें. स्वामींचा थाट. स्वामी स्वतः विरक्त तपस्वी होते व संसारविषयक गोष्टी त्यांना सर्व तुच्छ होत्या; परंतु लोककल्याणार्थ त्यांनीं बाह्यात्कारें सांसारिक वृत्ति धारण केली होती. त्यामुळे त्यांचा थाट एखाद्या राजदरबारासारखा झाला होता. त्यांच्या जवळ कारकून, शिपाई, प्यादे वगैरे सर्व सरंजाम होता. त्यांची कोठी व मुत- पाकखाना फार प्रचंड असे. गरीब गुरीबांस अन्नदान देण्याचा त्यांचा एकसा- रखा सपाटा असे. त्याचप्रमाणे छत्रपतीपासून तो दीन याचकापर्यंत, राव असो वा रंक असो, त्याचा यथायोग्य सत्कार करण्यांत ते सदैव तत्पर असत. शाहु महाराज व त्यांच्या राण्या हजारों लोकांच्या लव्याजम्यानिशीं धावडशीस १ शाहु महाराज स्वामींच्या मठांत हजारों माणसांसह जेवण्यास जात असत असेबद्दल कागदपत्रांचा आधार आहे. स्वामींस व त्यांच्या कारकुनास, छत्रपतींची स्वारी अमक्या वेळी येईल तेव्हां “खाशाखेरीज हजार माणसांचे रसोईचें सामान तयार करणे" ह्मणून आलेल्या अस्सल चिट्टवा सांपडल्या आहेत.