पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंदुखा “यादी दागीने श्री सु। इहिदेः- तोफा ३ कित्ता १ विजयदुर्गपैकीं १ भापकर १ राघोपंत २ धोकडमिंग १ सेखोजी आंगरे ३ बाजीराव २ कृष्णंभट देसाई २ जेजाला १३ गोठणें १ भांडे मोठे तारवांपैकी (यशवंतराव पवार याकडे पाठविलें ) कित्ता ५ २ फिस्तलें ६ निमचे तरवारा ८ मु॥ पिंपरी १ भांडें २ बंदुखा २ भाले १ जेजाला २ छ २३ रजब धावडशीस आले माळशिरस ता॥ अंतोबा बंदूख १ भांडे जंबोरा १ २ ह्यावरून स्वामी शस्त्रांचा संग्रह करीत असत असे दिसतें. बाजीराव व इतर मराठे सरदार ह्यांच्या पत्रांत स्वामींनीं बंदुखा व लढाऊ घोडे मागितल्याचे उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कित्येक सरदारांस बंदुखा व लढाऊ घोडे बक्षीस दिल्याचे दाखले सांपडतात. लेखांक २०७ ह्यांत उदाजी पवारास बंदूख दिली ह्मणून थोरातांच्या मुलांनीं स्वामींस खेळावयास बंदूख मागितल्याचा उल्लेख आहे. लेखांक १९३ ह्या पत्रांत, यशवंतराव पवारानें गढीमध्ये ठेवण्याकरितां एक तोफ