पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ “तुजला नशेद (निषेध) करून लिहिलें जे, मायेचे पायावर डोई ठेवून तिचे आज्ञेत राहणें. त्यास, तूं आम्हांस लिहिलें जे, मायेचे श्राप पुत्रास लागत नाहीं. तरी तिजला तूं शिवी दिलीस तरी तिचे श्रापें तुझें भस्म होईल. तिजजवळ तूं बेअदबी, कितेक लहान माणसांच्या बोलें तुफान होऊन तिजला कष्टी केले आहे. तुला पुढें वांचोन नांवरूप करणे असेल तरी तिचे पायांवर डोई ठेवून झाले अन्याय बक्षीस करून घेणें न घेस तरी तुझें बरें होत नाहीं. दारू खाऊन बेअदवी, माता ती तिजजवळ करितोस, हें बरें नव्हे. पाजी तूं आ हेस! काय आमचें वचन मोडशील ? तेव्हां बाजीचे बटकीकडून धरून आणून तुजला चाकर केले जाईल. हें पुरतें मनांत आणून आनंदीचे समजाविसी करून, तिचा कागद आला तरच तूं वांचलास नाहीं तरी तुझा मुलाहिजा होत नाहीं, हैं पुर्ते समजणे! (लेखांक ३०७) " , ह्या स्वामींच्या चरचरीत पत्रामुळे जगजीवन पवारास चांगलेच अंजन मि ळाले असेल हें निराळे सांगावयास नकोच आहे! असो. एकंदरींत स्वामींसारखे निस्पृही, सदाचारी, निरपेक्ष असे साधु पुरुष सर्व महाराष्ट्रमंडळाचे अध्वर्यु व मार्गदर्शक होते; त्यामुळे त्यांच्याकडून लहानथोर सर्व गोष्टींत हितमंत्र मिळून अतोनात लोककल्याण झाले, असे म्हटल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं. स्वामींच्या युद्धसंबंधीं देणग्या. स्वामी महाराष्ट्रांतल्या सर्व राजकारणांत लक्ष घालीत असत, हे त्यांच्या पत्रव्यवहारावरून सिद्धच आहे. परंतु ते स्वतः युद्धसंबंध शस्त्रास्त्रांचा संग्रह करीत असत व महाराष्ट्रवीरांना समरांगणास जातेवेळी प्रसाद ह्मणून तीं देत असत. हे ऐकून वाचकांस मौज वाटल्यावांचून राहणार नाहीं. सन इहिंदे ह्मणजे ३० स० १७३१ ह्या सालचा श्रीच्या शस्त्रांचा एक हिशोबाचा कागद सां- पडला आहे. तो येणेप्रमाणेः- -