पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" व अशाच हितमंत्रांनीं नाहींसे करण्याचा प्रयत्न करीत असत. कान्होजी आं ग्र्याचे पुत्र संभाजी व मानाजी ह्यांच्या मध्यें जो वैरभाव उत्पन्न झाला होता, तो नाहींसा करण्याबद्दल स्वामींनी पुष्कळ खटपट केली होती. त्याबद्दल त्यांनीं ह्या उभय बंधूंस परोपरीनें उपदेश केल्याचे उल्लेख त्यांच्या पत्रांत अनेक वेळां दृष्टीस पडतात. ‘“बंधुविरोधाचा अर्थ चित्तांतून टाकून सर्वमान्यता दिसे तो विचार करणे " (ग्रं० ले० ३६२), ह्या एका वाक्यांत स्वामींच्या ह्या उपदेशांचें सर्व सार आले आहे. संभाजी व मानाजी ह्या दोघां बंधूंचें सख्य करण्या करितां स्वामींनीं पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्याचें चीज झालें नाहीं. त्यामुळे त्यांनी संभाजी संबंधानें अनेक वेळां कठोर व अप्रिय उद्गार काढिले आहेत. (ग्रं० ले० पहा). स्वामींच्या सदुपदेशाचा प्रभाव सर्व मराठे सरदारांच्या कलहामध्येंच व्यक्त होत नसून, तो छत्रपति व त्यांच्या राण्या ह्यांच्या प्रेमकल- हामध्यँही केव्हां केव्हां दृष्टीस पडतो. लेखांक २५८ ह्यांत छत्रपतींच्या राण्यांस उद्देशून स्वामीमहाराज लिहितात:- " तुझीं आपले गुरूचे पायाची क्रिया केली आहे. छत्रपतीशीं भांडो ना. तर तुम्हीं निरवानिरव केली आहे. भांडल्यास हा देश टाकीन. राजांशीं तुम्ही भांडिलांत नाहींत, म्हणजे विश्वजन सुखी हो- ईल. ऋषीश्वराचे पायाची क्रिया केली आहे. तुम्हीं जें जेवण कराल तें राजास अमृतसमान लागेल. आणि तुमचें राजाचें एक चित्त नाहीं, म्हणजे तुर्की सोन्याचा ग्रास केला तरी राजास विषसमान वाटेल." ह्यावरून कलहाचें बीज नाहींसें करून सर्वांचा ऐक्यभाव ठेवण्याकडे स्वामींचें विशेष धोरण होतें हें स्पष्ट आहे. बंधुबंधु व नवराबायको ह्यांच्या कलहांत स्वामींचा उपदेश जसा दृष्टीस पडतो, तसा मातापुत्र ह्यांच्या विग्रहामध्येंही तो दिसून येतो. जेथें प्रेमळ व गोड शब्दांनीं काम होत असे, तेथें तसे शब्द स्वामी योजीत असत; व जेथें त्या शब्दाचा उपयोग होत नसे, तेथें कठोर व मर्मभेदक शब्द स्वामी उपयोगांत आणीत असत. त्यामुळे त्यांच्या त्या क्रोधयुक्त दर्पोक्तीनें तेव्हांच इष्ट परिणाम घडून येत असे. पवारांच्या घराण्यांतील प्रसिद्ध सरदार जगजीवनराव, जो स्वामींच्या कृपेमुळें पुढें नांवलौकिकास चढला, त्याचें व त्याच्या आईचें भांडण झालें; व तो स्वच्छंदानें व दुराचारानें वर्तू लागला. तेव्हां स्वामींनीं त्यांस जें पत्र लिहिले आहे, तें फारच जोरदार व कडक आहे. त्यांत स्वामी लिहितात:- " , -