पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनांत विकल्प आणावा ऐसें काय होतें? ह्या उपरी तुझी प्रसंगी बुद्धिमंत आहां. तरी श्रीच्या मनांतील किल्मीष काढून कृपावचनें गौरवीत तं करणें. बहुत काय लिहिणे.” स्वामींचा हितमंत्र. स्वामींचा मराठ्यांच्या सर्व राजकारणांत चांगला प्रवेश होता व सर्व राज्य- सूत्रे त्यांच्या तंत्रानें चालत असत हे मागे सांगितलेंच आहे. तथापि त्यांच्या हितमंत्राबद्दल स्वतंत्र उल्लेख करणे अवश्य आहे. राजकीय मनसव्यांतील ना- जूक डावपेंच सूक्ष्म रीतीनें मनन करून त्याबद्दल योग्य सल्लामत स्वामींकडून वारंवार मिळत असेच; तथापि त्याशिवाय बहुतेक मराठे सरदारांच्या मोहि- मांची व हालचालींची कच्ची बातमी ठेवून, स्वामीमहाराज त्यांस जेवणखाणाप- येत गुप्त रीतीनें आपला हितमंत्र कळवीत असत, हे वाचून त्यांच्या स्वदेश हिताच्या कळकळीबद्दल कोणासही साल्हाद कौतुक वाटल्यावांचून राहणार नाहीं. लेखांक १३१ मध्ये स्वामींनी चिमाजी आपांस लिहिले आहे की, “चिरंजीव बाजीराव यांस लेहून पाटावलें जे, त्या प्रांतें गेले आहां. ज्येष्ठमास पावेतों कोणाचा विश्वास न धरणे कोणा परकीयाचे हातचें व त्याचे घरीं जेवण, पाणी, विडा कांहींच न घेणे तैसेंच तुम्ही व तुमचे उभयतांचे पुत्र देखील, याप्रमाणे कोणाचा विश्वास न धरणे बहुत सावधपणे असत जाणे. ज्येष्ठ मास गेलियावरी मग पुढे तुम्हांस बहुत दिवस कोणाचें भय नाहीं. राज्याराम चिरकाल कराल.” लेखांक १३२ मध्ये लिहिले आहे कीं, “कित्येकांस कित्येक प्रकारें दंगे करणारांनी केले आहेत. याकरितां सावध राहत जाणे शाम- लाकडील कोणी येत जाईल त्याचा विश्वास धरीत न जाणे.” मध्यें स्वामींनी संभाजी आंग्रे ह्यांस स्थळीं (राजपुरीस) गेलेत आहां, (तरी) शामल लोकांचा विश्वास न धरावा. आपणास जतन करणे. तुमचे हातून महत् कामे होऊन यश मोठें पदरीं पडणं आहे. याजकरितां बहुत बहुत जतन आपणास करणें. " ह्यावरून स्वामींची किती दूरवर दृष्टि होती ह्याची कल्पना करितां येईल. स्वामी अशा प्रकारचे स्वजनकल्याणाचे गुप्त मंत्र सर्व मराठे सरदारांस वारंवार सांगत असत, एवढेच नव्हे तर केव्हां केव्हां त्यांच्या मधील गैरसमज व भांडणतंटेही . लेखांक ३१० "तुम्ही त्या असाच उपदेश केला आहे.