पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करून, हा हृदयंगम, प्रेमळ व भक्तिरसपूर्ण इतिहास महाराष्ट्रवाचकांस सादर करावा, अशी इच्छा उत्पन्न झाली. हीं पत्र उपलब्ध झाल्यानंतर, त्यांच्या अस्सल प्रती व स्वामींचा आणखीही पत्रव्यवहार कोठें उपलब्ध झाल्यास, हा मराठ्यांच्या इतिहासांतील अश्रुतपूर्व व मनोरंजक भाग समग्र रीतीनें व्यक्त होईल, म्हणून आणखीही शोध चालविला. तो सुदैवेंकरून धावडशी संस्थानांतील दप्तरांत थोडेबहुत कागद उपलब्ध झाले; व त्याच दप्तराचा बराच भाग पिंपरी येथें सुसाध्य झाला. त्याचप्रमाणे निर निराळ्या कारणांनीं भिन्न भिन्न स्थळीं पसरलेल्या स्वामींच्या पत्रव्यवहाराचा शोध लागून, कित्येक विद्वान् व रसिक मित्रांच्या कृपासाहाय्यानें तो सर्व हस्तगत झाला. येणेंप्रमाणे पांच सहा वर्षीच्या अवर्धीत धावडशी संस्थानासंबंधानें ए- कंदर हजार दीडहजार कागद आह्मांस मिळाले. त्यांवरून स्वामींच्या चरित्राचं खरें स्वरूप व्यक्त होऊन, त्याच्या अपूर्वत्वानें मनास थक करून सोडिलें. आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासासंबंधाचे जे कागदपत्र प्रसिद्ध झाले आहेत, त्यांवरून मराठ्यांच्या इतिहासाचा उत्तर भाग बराच सिद्ध झाला आहे; परंतु त्याच्या पूर्वभागाची अद्यापपर्यंत व्हावी तशी सिद्धता झालेली नाहीं. शिवाजी, संभाजी, राजाराम व शाहू ह्या चार छत्रपतींच्या बखरीवरून मराठ्यांच्या इति हासाच्या पूर्वार्धाची ह्मणजे मराठी राज्याच्या संस्थापनेची व अभ्युदयाची सा- मान्य माहिती मिळते; परंतु तिची अस्सल कागदपत्रांच्या साहाय्यानें अद्यापि छान झालेली नाहीं. ह्याकरितां इ० स० १७५० ह्या सालापूर्वीच्या कागदप त्रांचा शोध जितका लागेल, तितकें फार इष्ट व आवश्यक आहे. कारण, इ० स० १७५० पासून पुढे-ह्मणजे शाहूच्या मृत्यूनंतर पेशवाईची भरभराट झाली; व मराठ्यांच्या इतिहासास निराळें स्वरूप प्राप्त झाले. त्यापूर्वीचा इतिहास ह्मणजे छत्रपतींच्या कारकीर्दीचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा असून, मराठी राज्याची संस्थापना व उत्कर्ष कसा झाला, हे त्यारून उत्तम प्रकारें निदर्शनास येतें. ब्रह्मद्रस्वामींच्या पत्रव्यवहारानें इ० स० १७२८ पासून ३० स० १७४५ पर्यंतच्या अवर्धीतील मराठ्यांच्या खन्या इतिहासाचें बरेंच स्पष्टीकरण होऊन, त्या कालांत घडलेल्या राजकारणांची व इतर चळवळींची नीट संगति जुळण्यासारखी आहे. ह्मणून हा पत्रव्यवहार इतिहासदृष्टया अत्यंत महत्त्वाचा आहे असें ह्मटल्यावांचून