पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ ह्या पालखीच्या गांवाबद्दल बरीच वाटाघाट झाल्याचं लेखांक २६४ वरून दिसून येतें. शेवटीं कोथळे गांव पेशव्यांनी पालखीच्या खर्चाकरितां स्वामींस समर्पण केला. स्वामींचा राग खुद्द शाहुमहाराजांवर व त्यांच्या राण्यांवरही होत असे; व ते “तुमचें राज्य सोडून वाटेल तिकडे जाईन" असे ह्मणत. परंतु हे सिद्ध महापुरुष, आपल्या राज्याचे हितचिंतक, असे समजून ते त्यांना कोठें जाऊं देत नसत. स्वामी रुसून गेले तर शाहु महाराज त्यांस आणाशपथा घालून व परोपरीनें आर्जव करून त्यांस परत बोलावीत असत, असे पुढील पत्राव- रून दिसून येतें:- “तीर्थस्वरूप श्रीस्वामींचे शेवेसी:- अपत्यसमान शाहु राजे कृतानेक दंडवत विनंति उपरी आपण न विचा रितां गेले ही गोष्ट वडीलपणास उचित कीं काय? आपले जाण्यामुळे आमचें चित्त स्वस्थ नाहीं. यास्तव हे पत्र आपणांस लिहिले आहे. तरी वडीलपणें दर्शनाचा लाभ देऊन आमचे चित्ताचा संतोष करून गेले पाहिजे. वडिलास आमचे गळ्याची शपत असे. अनमान न करितां माघारे आले पाहिजे. एकदा लाभ आम्हांस द्यावा. यांत आमचें समाधान व वडिलांसही उचीत आहे. आपण आम्हांस न पुसतां स्वामी गेल्याकारणें चित्तास समाधान नाहीं. तर पत्रदर्शनी येऊन दर्शन देऊन सनाथ करण्यास स्वामी अनमान करतील तर आमची शपत असे. हे विनंति " - छत्रपतींच्या राणीवर स्वामी रागावल्याचें एक पत्र उपलब्ध झाले आहे. त्यावरून राणीनें स्वामींची समजूत करण्याबद्दल जगन्नाथपंताची विनवणी केली आहे. हें पत्र येणेप्रमाणे:- “श्रीमंत सकल सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब यांणीं राजश्री जगन्नाथ पंत दादाजी यांसी आज्ञा केली ऐसीजेः- तुझीं विनंतिपत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन लेखनार्थ अक्षरशः विदित जाला. श्री (स्वामी) त्र्यंबकेश्वरची यात्रा व गंगास्नान करून आले त्याचें वृत्त लिहिलें तें कळोन संतोष जाला. दर्शनास यावयाचें लिहिलें तरी वर्शनास येणें. श्री परमहंस स्वामी यांणीं येथून रुसवा करून गेले ! तरी इतरांच्या सांगितलें ऐकोन -