पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ आहे. “स्वामींनीं राजश्रीची विनंति मान्य करून क्षौर केलें व गोमूत्र चालतें केलें.” ह्या वाक्याचा अर्थ आतां वाचकांच्या नीट लक्षांत येईल. स्वामींच्या रागाचे असे अनेक वेळां प्रसंग येत असत व शाहु महाराज स्वतः जाऊन त्यांचें समाधान करीत असत. इ० स० १७३३ मध्यें निंवकर व अनेवाडीकर ह्यांचा गांवच्या शिवेवरून तंटा झाला. त्या वेळींही स्वामी असेच रागावले व शाहु महाराजांनी त्यांची समजूत केली. त्या प्रसंगाची हकीकत अशीः - निंबकरांचा विरुवाईराणीकडे कांहीं वशिला होता. तेव्हां त्यांनीं त्या जोरावर अन्यायानें, अनेवाडीकरांची शीव रेटली. "हैं वर्तमान अने बाडीकर पाटील यांनी बाबांस सांगितले. त्यावरून गोसावीबावा नव दिवस शिवेस जाऊन बैसले. हें वर्तमान राजश्री स्वामींस कळले. मग राजश्री स्वामी जाऊन गोसावीवावांचे समाधान करून पालखींत बैसवून धावडसीस पाठविलें. कार्तिक मासामध्ये ही गोष्ट झाली. जे समयीं पालखीत बसले तेव्हां बोलिले जे, “आजि पालखींत बैसावे आणि उद्या पायीं चालवावें कीं काय" ? तेव्हां राजश्री स्वामींनी उत्तर दिलें कीं, “नेहमीं पालखी दिल्ही.” त्यावर तीर्थरूप राजश्री राऊ यांस पत्र पाठविलें कीं, पालखीचा खर्च तुझीं चालवणे. त्यावर राजश्री स्वामी प्रतापगडास गेले. माघारे फिरतेसमयीं माभळेश्वर (महाबळेश्वर), धोम, वाईस येऊन राहिले. संक्रांति वाईस जाली. तेथून येऊन निंबावर मुक्काम केला. आमावस्या निंचावर झाली. माघ शुद्ध पक्ष द्वितीयेस धावडसीस श्रीच्या दर्शनास महालसहवर्तमान गेले. ते समयीं पालखीचा मजकूर घातला, आणि एक गांव मागितला. ते समयीं राजश्री स्वामींनीं प्रतिनिधींस आज्ञा केली कीं, राजश्री पंत प्रधान यांचे जिल्हे- मध्ये गांव देणे. त्यावरून प्रतिनिधि यांनीं राजश्री तात्यास गांवाविशीं सांगितले. यांनीं उत्तर दिले कीं तुमच्या चित्तास येईल तो गांव देणे. त्यावरून गोसावीवावांनीं कोथळे व बेलसर या गांवांतून एक गांव मांगितला." पुढे , १ महादाजीपंत पुरंदरे. २ हा अस्सल पत्रांतील उतारा आहे. देव यांचे दिसतें. परंतु पत्र अर्धे फाटलेले आहे त्याचे नांव गांव समजत नाहीं ! या पत्राचे हस्ताक्षर मल्हार तुक असल्यामुळे ते कोणास लिहिलेलें