पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ चिमणाजीपंत भागवत ह्यांच्यावर स्वामींची पूर्ण कृपा असे. त्यामुळे तेही केव्हां केव्हां स्वामींच्या रागाचें निरसन करीत असत. स्वामींच्या कोपाच्या स्थितीचें वर्णन जगन्नाथपंतांनी आपल्या वडिलांस एका पत्रांत लिहिले आहे. ते येणेप्रमाणः- - “तीर्थरूप रा० दादा वडिलांचे सेवेसीः- - · . श्रीमत् स्वामी क्षौर करीत नाहीं. शरीर तो फार कृश जाहालें. अपत्यें जगन्नाथानें चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान ता० फाल्गुन शुद्ध पौर्णिमा शुक्रवार पावेतों वडिलांचे आशी- वीदेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष कित्येक प्रकारें सांगितलें परंतु ऐकत नाहीं. कोणाचं ऐकत नाहीं. बावा ह्मणतात जे, धावडशीस दादा आल्यावांचून कांहीं येत नाहीं. वडिलांप्रती विशेष काय लिहिणें क्षौर फार वाढले आहे. जागाचा कंटाळा आला. सायंकाळपर्यंत एकासनीं जप करितात. मागतीं जप ग्रहर रात्र पावेतों करितात. निद्रा येत नाहीं. हे विनंति पुढे काय होईल ते पहावे. हे विनंति.” . हे पत्र ता० ८ मार्च ३० स० १७३४ सालचे असावें. त्यानंतर स्वामींचा राग दूर करण्याकरितां ता० १४ जून ३० स० १७३४ रोजी शाहु महाराज स्वतः धावडशीस गेले. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलें, व नम्र भाषणाने त्यांचा राग दूर करून श्री भार्गवरामास माळशिरस हा गांव इनाम दिला. ह्या इनाम- गांवाची सनद शाहु महाराजांनी स्वदस्तुर लिहून दिली आहे. तींत येणें- प्रमाण मजकूर आहे:- - श्रीभारगोराम. . “श्री भुलेश्वर दरोवस्त माळसीरस नजर देसमुखी व बाबी खेरीजकरून नजर अस. भोयाचा चावर व इटलपताचा चावर व सरदेसमुखी व मो (ग) लाई व मोकास बाब नजर. साहोत्रा नजर भारगोरामास नजर.” ह्या भेटीचा उल्लेख बाजीराव पेशव्यांच्या लेखांक २८ व २९ ह्या पत्रांत १ ही अस्सल सनद आह्मांस रा. आपासाहेब भागवत मु० पिंपरी ह्यांचे दप्तरांत मिळाली. तिची हुबेहूब प्रतिकृति शाहुमहाराजांच्या अक्षरांचा नमुना दाखविण्याकरितां सोबत जोडली आहे.