पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ 1, इतकें सिद्ध होतें कीं, स्वामींस मराठी राज्यांतील बहुतेक माणसें पूर्ण माहित असून, त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना उदयास आणण्याचे काम त्यांनी आपली योजकता व गुणग्राहकता चांगली व्यक्त केली आहे. स्वामींच्या अंगीं ही लो- कसंग्राहकशक्ति चांगली वसत असल्यामुळे त्यांच्या हातून मराठी राज्याचे फार कल्याण झाले ह्यांत शंका नाहीं. अर्थात् स्वामींच्या शिफारसीमुळे व कृपासाहा- य्यामुळे सर्व प्रख्यात मराठे सरदारांचा ज्या अर्थी उदय झाला आहे त्या अर्थी त्यांनीं ह्या सर्ववंद्य सत्पुरुषाविषयीं पूज्यबुद्धि व अभिमान बाळगावा हें रास्त आहे. स्वामींचा राग. ● स्वामींचा स्वभाव अत्यंत गोड व प्रेमळ असे. तथापि त्यांचा कोणी आज्ञा- भंग केला अथवा अपमान केला, तर तो त्यांस अगदर्दी सहन होत नसे. ते तेव्हांच कोपायमान होत असत, आणि आपले खाणे पिणे सोडून देत असत. नित्यशः तक्र व गोमूत्र प्राशन करण्याचा त्यांचा नियम असे. तोही मग बंद ठेवीत, आणि कोठें तरी शांत व निर्जन अशा स्थळी जाऊन जप करीत बसत. त्यांना एकदा राग आला ह्मणजे त्यांची समजूत करण्यास सामान्य मनुष्य- समर्थ नसे. त्या स्थितींत ते प्रत्यक्ष जमदशिसारखे भासत असत. मग ते कोणास भेटत नमत व कोणाशीं बोलत नसत. अशा सक्रोध वृत्तींत ते कित्येक दिवसपर्यंत अगदीं उपाशी तापाशी राहत; व क्षौर वगैरे कांहीं न करितां दाढी वाढवून बसत. मग ही बातमी छत्रपति शाहुमहाराज अथवा पेशवे व्यांस कळे. नंतर ते भेटीस येऊन स्वामींची विनवणी करीत व त्यांच्या रागाचें कारण काढून टाकून त्यांची समजूत घालीत. नंतर स्वामीमहाराज आपल्या मटास येत. स्वामींचा हा राग अगदर्दी वरकरणी असे, व त्याचा उद्देश केवळ उन्मत्त लोकांस शासन करण्याचा किंवा इष्टकार्य साधण्याचा असे. स्वामीं- वर शाहु महाराज व त्यांच्या राण्या ह्यांची पराकाष्ठेची भक्ति असल्यामुळे, स्वामींस कोणी राग आणलेला त्यांस अगदर्दी खपत नसे. ते तेव्हांच त्याचें पारिपत्य करीत असत. त्यामुळे स्वामी रागावले म्हणजे सर्वांची फार त्रेधा उडत असे. स्वामींच्या विश्वासाचीं व अंतःकरणाच्या अंतर्भागांतलीं जी माणसे असत, त्यांना स्वामींच्या स्वभावाचे हे सर्व आविर्भाव पूर्ण माहीत असत. त्यामुळे तीं स्वामींच्या मर्जीचा नोकझोक पाहून वागत असत. स्वामींचे पट्टशिष्य