पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ , अधिकार देण्याचा परिपाठ असे. १८ व्या शतकाच्या प्रथमार्धामध्यें आपलें राजकार्यधुरंधरत्व व पराक्रमपटुत्व ह्या दोन अप्रतिम गुणांचा उज्वल प्रकाश अखिल महाराष्ट्रांत चमकत ठेवणारी जीं नररत्ने निर्माण झालीं, त्या सर्वांच्या उदयास, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीनें, हे स्वामी महाराज कारणीभूत झाले आहेत. थोरले बाजीराव पेशवे व इतर मराठे सरदार ह्यांची वारंवार शाहु महाराजांजवळ शिफारस करून त्यांचे वास्तविक गुण त्यांच्या नजरेसमोर आण ण्याचा व त्यांची योग्य जागीं योजना करून स्वदेशकार्य सिद्धीस नेण्याचा स्वामींचा क्रम फार प्रशंसनीय असे. पेशव्यांच्या जवळही ते कर्तृत्वशाली मा- णसांची तारीफ करून त्यांस मोठ मोठे हुद्दे व महत्वाचे अधिकार मिळवून देत असत. लेखांक २७८ ह्यामध्यें धारच्या पवारांचा मूळपुरुष उदाजी पवार ह्याबद्दल स्वामींनीं अशी शिफारस केली आहे कीं, “उदाजी पवार कर्ता सर- दार. पलीकडील वर्षी राजश्रींनीं उदाजीस रायगड प्रांतें शामलावर पाठ- विला, तो वाडीपाचाड येथें सिद्दी अंबर अफवानी याणें पांच सातशे माणूस 'जमावानिशीं युद्धास उभा राहिला. ते समयीं उदाजीनें त्याचा मोड करून अफवानीचें शीर कापून आणिलें. महाड, बाणकोट हस्तगत केला. सिद्दी साद यासी धास्त लाविली. रायगडचे मोचें उठविले. मग गोवळकोटावर गेला. तेथेंही शर्तच केली. तर, उदाजी सारिखा सरदार तुम्हांकडेस आला, तर त्याचा सरंजाम करून चालविल्या तो लाखाचं यश देईल. आम्ही तुमचे जागली. तुम्ही आमचे शब्द मानितां म्हणून आम्ही तुम्हांस सांगतों. न ऐकाल तर मग आपणास लोकांमध्यें श्रीचें कां म्हणवितां व आम्हांस महत्त्व कशास देतां ? तुम्ही जाणते सुज्ञ आहां.” लेखांक २७२ मध्ये जगजीवन पवाराबद्दल स्वामींनीं अशी शिफारस केली आहे कीं, “जगजीवनराव पवार जर तुम्हांकडे येईल तर त्याचे मनानुरूप सरंजाम करून त्यास आणावा. पवार मर्दाने, पुरातन आ हेत. जगजीवन कर्ता, तरवारीचा शूर आहे. त्याला हत्ती देऊन बहुमान करून आपणाजवळ आणिल्यास तुमची कीर्ति होईल, आणि आमचें वचन ऐकिलें असें होईल.” ह्याचप्रमाणे लेखांक २८९ ह्यामध्यें, आंगऱ्याचा नामांकित सरदार दत्ताजी कनोजे ह्याचा पुत्र सयाजी कनोजे ह्यास महिपतगडचा हवाला देण्याबद्दल स्वामींनीं शिफारस केली आहे. ह्या सर्व उदाहरणांवरून