पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० तांनां, महाभारत व रामायण ह्यांतील थोर व पराक्रमी पुरुषांच्या उपमा देऊन व त्यांचा गौरव करून त्यांचें चित्त प्रसन्न करण्यांत त्यांचा हातखंडा असे. बहु- तेक सर्व मराठे सरदारांस स्वामींनीं 'जडभरत', 'बोधला', 'सुदामा' वगैरे प्रसिद्ध देवभक्तांचीं नांवें ठेविली होती. स्वामींची नेहमींची एक ह्मण असे कीं, ज्याचा भार्गव सारथी । त्यास विघ्नं काय करिती ॥ अर्थात् ही उक्ति स्वामींच्या मुखांतून निघाली ह्मणजे तिच्या गर्जनेनें विघ्नांनींच घावरून पळावें, ह्यांत आश्चर्य तें काय ? श्री समर्थ रामदासस्वामींच्याः- समर्थाचिया सेवकां वक्र पाहे । - ह्या शब्दांत जें वक्तृत्व असा सर्व भूमंडळीं कोण आहे ॥ व जें सामर्थ्य आहे, तेंच स्वामींच्या वर निर्दिष्ट केलेल्या वचनांत दिसून येतें. अशा जोरदार वाणीनें मिळणा-या उत्तेजनानें मराठेवी- रांच्या हातून लोकोत्तर कृत्ये व्हावींत ह्यांत नवल ते काय ? स्वामींची शिफारस. स्वामींच्या अंगीं व्यवहारचातुर्य विशेष असल्यामुळे त्यांस मनुष्यपरीक्षा फार चांगली करितां येत असे. ह्या कारणास्तव, छत्रपति व पेशवे ह्यांच्या दरबारांत स्वामींच्या शिफारसीस विशेष मान असून, त्यांनीं पसंत केलेल्या माणसास योग्य • १ स्वामींची ही उक्ति त्यांच्या कित्येक पत्रांतही आढळून येते. उदाहरणार्थ पुढील पत्र पहा:- - "श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं. - सहस्रायु चिरंजीव विजयीभव नाना प्रधान यांप्रती आशा ऐसीजेः- तुझीं पत्र छ०५ जमादिलावलचे पाठविलें तें छ० १६ जमादिलाखरी पावोन बहुत समा- धान जालें. तरी नाना, ज्याचा भार्गव सारथी, त्यास विघ्नें काय करिती ? आमचा निजध्यास तुह्मां वितरिक्त नाहीं. सर्व तनमन आमचें तुझांखेरीज नाहीं. आह्मीं मागे दोन चार पत्र तुझांस लिहिलीं, परंतु पावलीं न पावली है न कळे. तुझी स्वदेशास भिवरा उतरोन आलेत झणजे दर्शनच जालें. वरकड यंदा आमचे शरीरीं अशक्तपण बहुत आलें. चौ दिवशीं समाधीस जाऊं. आपल्याकडील हमेशा सुखसंतोषाचे वर्तमान लिहीत गेले पाहिजे. तुझां वेगळे आह्मांस जोड कांहीं नाहीं. हे आज्ञा " ,