पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ ल्याचे लेखांक १४६ ह्या चिमाजी आपांच्या पत्रावरून दिसून येतें. ही नुसती भार्गवपट्टीच नव्हे, तर श्री भार्गवाच्या नांवाचा शिक्का सर्व कोंकणांत चालू करावा, अशीही स्वामींची महत्वाकांक्षा होती हैं ऐकून कोणास आश्चर्य वाटणार नाही ? ह्यासंबंधाचं स्वामींचें स्वदस्तुरचें एक पत्र उपलब्ध झाले आहे. त्यांत पुढील सांकेतिक मजकूर आहेः- “शामलाचं अगदीं निर्मूलन. जंजिरा, उंदेरी, पद्मदुर्ग, व अंजणवेली गोवळ येथील इस्तकबिल कार्तिक मास तागाईत मार्गशीर्ष मासामध्यें निर्मूलन होतें. कार्य सिद्ध जाहलेयासी चौदा लक्षांचा कोंकणांत हक श्री भागर्वपट्टी दरसदे आकार रुपये तीन प्रमाणें व श्रीचा शिका याप्रमाणे हरफः- श्री भार्गव चरण । परमहंस ब्रझेंद्र शरण ॥ - ऐसी मुद्रा श्रीस करून द्यावी. हें सकल यश पेशवे बाजीराव यांस व आंगरे यांस येतें.” यापत्रावरून यतिमहाराजांची महत्वाकांक्षा केवढी जबरदस्त होती हैं व्यक्त होतें. स्वामींची उत्तेजन देण्याची तन्हा. , स्वामी स्वतः निरिच्छ सत्पुरुष असून त्यांस श्री भार्गव प्रसन्न होता, अशी लोकांची समजूत असल्यामुळे त्यांच्या मुखांतून जे प्रसादवचन निघेल तेंच कार्यसिद्धि करील, अशी सर्वांची खात्री झाली होती. त्यामुळे स्वामींचा आशी- र्वाद घेण्याकरितां प्रत्येक सरदार अगदर्दी पराकाष्ठेचा उत्सुक असे. तशांत, स्वा मींची आशीर्वादरूपानें प्रोत्साहन देण्याची तन्हा फारच चित्ताकर्षक असल्यामुळे त्यांच्या वाणीचा परिणाम कांहीं विलक्षणच होत असे. त्यांच्या शब्दांत असा विचित्र मोहकपणा असे कीं, त्यानें सर्व लोकांची अंतःकरणें कसल्याही दुःखांनीं व चिंतांनीं व्याप्त असली, तरी तीं तेव्हांच आनंदानें उल्लसित होत असत. स्वामी आपणास पेशव्यांचे "जागली" म्हणजे पहारेकरी असें म्हणत असत. व वारंवार त्यांचा उद्वेग दूर करून त्यांस उत्तेजन देत असत. त्यांनी बाजी- राव व चिमाजीआपा ह्यांचीं राम व लक्ष्मण अशीं नांवें ठेविली होती. त्यांस पत्र लिहितांनां 'मननिर्मलगंगाजल' 'सत्यवक्ता' 'एकवचनी' 'भक्त- राज' 'निजभक्तशिरोमणी' ‘रणधीर’ ‘रणशूर' अशीं गोड व प्रेमळ विशेषणं लिहिण्याचा त्यांचा सांप्रदाय असे. आणि केव्हां केव्हां त्यांचें अभिनंदन करि- 6