पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ , बंधु राम लक्ष्मण तुमची फत्ते झाली, ह्मणजे त्रैलोक्यांत माझी कीर्ति जाहली. हेचि मी इच्छा रात्रंदिवस श्रीपाशीं इच्छितों पैका नामर्दाचा; इजत व यश मर्दाचं.” " ..... लेखांक २६४ मध्ये लिहितात:- "तुर्की खुशाल सिंहासनी बसणे.. मजला पालखी नलगे. कांहीं नलगे. लेखांक २७६ मध्ये लिहितातः – रक्षोन चंद्रसूर्यपर्यंत दिग्विजय व्हावा. सूर्यपर्यंत (तुमचा दिग्विजय व्हावा.) नित्य करीत असो. " - तुझीं सुखी असावे हेच माझी पालखी.” “वसिष्ठाचा हेत जे, हरिश्चंद्राचे सत्व त्याचप्रमाणे आमचाही हेत जे, चंद्र- हा हेत धरून तुमचें कल्याण श्रीजवळ - लेखांक १३६ लिहितातः— “यश संपादोन सुखी आलेत, हे वृत्त अवगत होऊन कोटिशः संतोष जाहला. आह्मांस द्रव्याची इच्छा नाहीं. तुमची कीर्ति ऐकोन परम सुखी आहों.' " ह्या सर्व उद्गारांवरून स्वामींचें खरें हृद्भुत काय होतें ह्याची चांगली ओळख पटते. अर्थात् स्वामींचा असा उदात्त हेतु असल्यामुळे त्यांच्या उत्तेजनानें व प्रेरणेनें मराठे सरदारांच्या हातून महत्कृत्यें घडून आलीं, व त्याने महाराष्ट्राचें अपरिमित कल्याण झालें, ह्यांत शंका नाहीं. स्वामींची महत्वाकांक्षा. • स्वामींचा हेतु हिंदुधर्माचा सर्वत्र प्रसार व्हावा हा होताच. तथापि, त्यांची विशेष इच्छा, श्री भार्गवाचा भक्तिपंथ चोहोंकडे वाढवून श्रीचीं देवालयें व महो- त्सव जागोजाग करावेत, अशी विशेष होती. श्री समर्थ रामदास स्वामींनीं जागोजाग मारुतींची स्थापना करून सर्वत्र भक्तिमार्ग वाढविण्याचा प्रयत्न के ल्याचें प्रसिद्धच आहे. त्याप्रमाणे ह्याही स्वामींनीं, कोंकणांतील पेढें, गोठणे, वगैरे ठिकाणीं व देशांतील धावडशी, माळशिरस वगैरे गांवीं भार्गवरामाची संस्थापना केली; व जागोजाग इतर देवतांचींही देवालये बांधून सर्व जनांच्या मनांत भक्तिभाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. तत्प्रीत्यर्थ त्यांनीं श्री भार्गवाच्या नांवाने बहुत भिक्षाद्रव्य मिळविले. तथापि तेवढ्यानें त्यांची मनीषा तृप्त झाल्याचे दिसत नाहीं. त्यांनी सर्व मराठी राज्यांत भार्गवपट्टी नांवाचा देवाचा एक कर गांवगन्ना स्थापित करण्याबद्दल आपला हेतु दर्शवि-