पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" लिहिलेलीं दहावीस पत्रे, व ब्रह्मंद्रस्वामींची छोटीशी बखर, इतकीच माहिती स्वा- मींसंबंधानें आजपर्यंत उपलब्ध झाली होती. ह्या अल्प साहित्यानें स्वामींच्या सुरस व गोड चरित्राची अस्पष्ट कल्पना वाचकांच्या नेत्रांसमोर येऊन, तत्संबंधानें ब- रीच लालसा उत्पन्न झाली. परंतु ती परिपूर्ण होण्याचा योग बरेच दिवस आला नाहीं. मध्यंतरीं रा० सा० बापट ह्यांनीं, बडोदें येथील “बालांकुर " मासिकपुस्तकामध्यें, स्वामींचें चरित्र त्यांच्या बखरीवरून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो अस्सल कागदपत्रांच्या अभावामुळे जावा तसा सिद्धीस गेला नाहीं. येणेप्रमाणे ह्या थोर सत्पुरुषाचें सविस्तर खरें चरित्र व अस्सल पत्रव्यवहार इतके दिवसपर्यंत उपलब्ध झाला नाहीं. परंतु तो योग सुदैवानं लौकरच प्राप्त झाला, ही अत्यंत संतोषाची गोष्ट होय. , इ० स० १८९५ सालीं ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करीत असतांना, सातारचे छत्रपति प्रतापसिंह महाराज यांच्या दप्तरांत, धावडशी येथील पत्रव्य- वहारांच्या बारनिशीचें एक पुस्तक उपलब्ध झालें. ह्यांत ग्रांटडफ साहेबांनीं आपल्या इतिहासांत ज्यांचा उल्लेख केला होता अशीं बहुतेक सर्व पत्रे, अस्सल- बरहुकूम नकलांच्या रूपानें, दाखल केली होती. हे प्रतापसिंह महाराज फार रसिक व विद्याव्यसनी असल्यामुळे ह्यांनी मराठ्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा फार संग्रह केला होता. हे पेशवाई समाप्त झाल्यानंतर इ० स० १८१८ मध्ये सातारच्या गादीवर विराजमान झाले. ह्यांच्याच दरबारी ग्रांटडफ साहेब ३० स० १८२३ पर्यंत रेसिडेंटाच्या हुद्यावर होते; व ह्यांनींच त्यांच्या इतिहासास उत्कृष्ट साहाय्य केलें होतें. ह्यांचा व तत्कालीन इंग्रज मुत्सद्दी एल्फिन्स्टन, मालकम, मनरो वगैरेंचा फार स्नेह होता. ह्यांच्या उत्तम गुणांची कीर्ति इंग्लं- डमध्येही जाऊन, त्यांना लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीचे 'ऑनररी मेंबर' हें सन्मानाचें पद प्राप्त झाले होतें. ह्यांनी दिल्लीच्या बादशाहांचीं फा- रसीभाषेतील पत्रे, ब्रह्मद्रस्वामींचीं पत्र, आणि इतर महत्त्वाचे ऐतिहासिक लेख त्यांचा संग्रह केला होता. ह्यावरून ह्यांची इतिहासप्रियता व विद्याभिरुचि व्यक्त होते; व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्यावांचून राहवत नाहीं. त्यांच्या संग्र हांतील ब्रह्मद्रस्वामींस लिहिलेली पेशव्यांची पत्रे वाचून, ग्रांटडफ साहेबांप्रमाणे आमचेंही मत, र्ती “केवळ अमूल्य" आहेत, असेंच झालें; व तीं समग्र प्रसिद्ध ,