पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध जर्मनीच्या काळजावर घाव घालण्याची वाट मोकळी करून देणारें हैं शेर- बुर्गचें दुर्घट स्थळ जर्मनीनें कांहीं सुखासुखी सोडलें नाहीं. शेरबुर्ग हातचें गेलें म्हणजे आपल्या युरोपच्या दुर्गम किल्ल्याचा तटच ढांसळल्यासारखा आहे, हे जर्मनी पक्के जाणत असल्यानें त्यानें शेरबुर्गच्या बचावासाठी निकरानें झुंज खेळण्यांत कसूर केली नाही आणि अमेरिकनांनाहि शेरबुर्गचा पाडाव करण्यास अतोनात बळी द्यावे लागले हैं निकामी झालेल्या सैनिकांचे आंकडे प्रसिद्ध होत आहेत, त्यावरून कळून येईलच. अर्थातच शेरबुर्गचा संग्राम ही चालू महायुद्धांतील क्रांतिकारक लढाई आहे हे ओळखून उभय पक्षांनी आपआपल्या पराक्रमाची शर्थ केली. त्यांत जर्मन पक्षाला साधनसामुग्रीचा व विशेषतः दारूगोळ्याचा अखेरीस तुटवडा पडून हार खावी लागली आणि अमेरिकनांना विजयश्रीनें वरलें. ६८ जर्मनीच्या बाजूला साधन-सामुग्रीचा तुटवडा पडत जाऊन यापुढे जर्मनीची बाजू ढांसळत जाणार हैं भाकीत आम्हीं ता. ९ जूनच्या अग्रलेखांत केले होतें व त्याचें आतां प्रत्यंतर येत आहे. दोस्त राष्ट्रांच्या वैमानिक हल्ल्यांनी जर्मनीच्या सर्वच शस्त्रास्त्रांची धुळधाण होत असल्याने जर्मनीला यापुढे मोठे सैन्य एकत्र जमवून प्रतिपक्षाचा हल्ला थोपवून धरणें दुर्घट होत जाईल. उलटपक्षी दोस्त राष्ट्रांची साधनसामुग्री दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि एकेक नवें मोक्याचें ठाणें जिंकल्यानें साधनांची जमवाजमव करण्याची त्यांची अनुकूलताहि वृद्धिंगत होत आहे. याचा नैसर्गिक परिणाम जर्मनीच्या पराजयांत होणार हें आतां उघड दिसूं लागले आहे. स्वारीपूर्वीची प्रचंड तयारी तिसऱ्या आघाडीवरील स्वारी हा या युद्धांतला क्रांतिकारक भाग असल्याने दोस्त राष्ट्रांनी या चढाईची तयारीहि तशीच प्रचंड केली होती. किनाऱ्यावर सैन्य उतरविणें, मार्गात त्याचें रक्षण करणे आणि किनाऱ्यावर उतरलेल्या सैन्याला युद्ध साहित्य पुरविणें या कामी दोस्तांची ६५०० जहाजें सतत खपत होती आणि अद्यापाई त्यांची ही कामगिरी सारखी चालूच आहे. ही स्वारी निर्वेधपणे करतां यावी म्हणून दोस्तांच्या वैमानिकांनी प्रथम जर्मन पाणबुड्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांच्यावर अभिगोलांची वृष्टि करून त्यांचा समाचार घेतला आणि गल- बतांचा मार्ग निष्कंटक केला. त्यानंतर फ्रान्सचा किनारा गांठण्यापूर्वी वाटेंतले पाण-- सुरुंग काढून रस्ता मोकळा करणे जरूरीचें होतें. हें काम दोस्तांच्या सुरुंगझाडू जहाजांनी आपल्या जिवाची तमा न बाळगतां मोठ्या धाडसानें पार पाडलें. अशा रीतीनें किना-याकडे जाण्याचा रस्ता खुला झाल्यावर फ्रेंच किनाऱ्यावरील जर्मन बाते यांचा समाचार घेणें जरूरीचें होतें. ही कामगिरी बॉम्बफेकी विमाने आणि बेडर जहाजें या उभयतांकडे सोपविण्यांत आली होती. शंभर शंभर विमानांचा