पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युरोपांतलं नवें जिब्रॉल्टर ६९ एकेक ताफा असे पंधरा ताफे या कामगिरीवर होते. अशा १५०० विमानांनी एकेका दिवसांत दहा ते पंधरा खेपा करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर जेथें कोठें जर्मन तोफांचे ताफे, दारुगोळ्याची कोठारें, पेट्रोलच्या टाक्या, रणगाड्यांचे तळ, विमानांचे तळ, सैन्यवाहू आगगाड्यांचे डबे दिसले त्या त्या भागावर अग्निगोलांचा एक- सारखा वर्षाव करून जर्मनीच्या युद्धसाहित्याचा धुव्वा उडविला. वैमानिकांनी फेकलेल्या बॉम्ब्सनाहि दाद न देणाऱ्या ज्या बातेऱ्या किनाऱ्यावर होत्या त्यांच्या- वर दोस्तांच्या रणतयांनी आग ओकण्यास सुरुवात केली. नेल्सन, रॅमिलीज, वॉर- स्पाइट इत्यादि ब्रिटिशांची आणि टेक्सस, नेव्हाडा, आर्केन्सस प्रभृति अमेरिक- नांची अव्वल दर्जाची बेडर जहाजें जर्मनांच्या बंदर-संरक्षक तोफखान्यावर जेव्हां आपले अजस्र गोळे फेकूं लागली तेव्हां जर्मन बाते-यांच्या ठिकन्या उड्डूं लागल्या. एके ठिकाणी जर्मनांच्या १७ तोफांची बातेरी होती तिचा सुगावा काढून ब्रिटि शांच्या सुप्रसिद्ध नेल्सन रणतरीने तिच्यावर रोख धरला आणि आपल्या १५ इंची व्यासाच्या तोफांच्या तोंडांतून दर मिनिटास ९ टन वजनाचे गोळे फेंकण्यास सुरुवात केली. एवढ्या जबरदस्त मायापुढे जर्मन बातेया टिकाव धरूं शकल्या नाहीत, त्यांच्या चिंधड्या उडाल्या आणि जर्मनांच्या तोफा बंद पडल्यानें दोस्तांचें - सैन्य निर्वेधपणे किनाऱ्यावर उतरून दहा-पंधरा मैल आंतपर्यंत घुसूं शकले. वैमानिकांनी केलेला आगीचा वर्षाव दोस्तांच्या फौजा किना-यावर उतरून तेथें आपला तळ देऊन ठाण मांडून बसल्यावर बेडर जहाजांची कामगिरी संपली. पण बॉम्बफेक्या वैमानिकांच्या कामगिरीला अंतच नाही. आपल्या सैन्याच्या तळावर शत्रूच्या विमानांची धाड -येऊं नये म्हणून कांहीं लढाऊ विमानें पहारा करीत असतात आणि बाकीची लढाऊ विमानें बॉम्बवृष्टि करणाऱ्या विमानांच्या संरक्षणाकरितां त्यांजबरोबर जाऊन बॉम्ब- बरसात करण्यास साहाय्य करतात. दोस्तांचे वैमानिक इल्ले युरोपवर सुरू झाल्या- -वेळेपासून दि. १५ जूनपर्यंत दोस्तांच्या बॉम्बफेक्या विमानांनी चार लक्ष टन बॉम्ब- गोळे युरोपवर फेंकले व त्यांतले दोन लक्ष पंचाहत्तर हजार टनाचे गोळे खुद्द जर्मनी- वर फेंकले, एवढे सांगितले म्हणजे वैमानिक हल्ल्यांमुळे जर्मनीच्या कारखा- न्यांचा, रणसाहित्याचा, वहातुकीच्या साधनांचा कसा चुराडा झाला असेल आणि पेट्रोलसारख्या ज्वालाग्राही वस्तूंचा केवढा भडका उडाला असेल याची कल्पना येईल. अशा रीतीनें जर्मनव्याप्त प्रदेश सडकून काढून जर्मनीचें युद्धयंत्र खिळ- खिळे केल्यावर अमेरिकनांनी शेरबुर्गला गराडा दिला आणि त्याजवर जल, स्थल व आकाश अशा तिन्ही बाजूंनी भडिमार सुरू केला. जर्मनीचें या भागांत २५ ते ३० हजार सैनिक होते, त्यांतले तीन-चार हजार बंदिवान् झाले. इतर सर्वांचा बहुतेक फडशा पडला तेव्हांच जर्मनांनी हें दुर्घट स्थळ हातचें जाऊं दिलें. अमेरि-