पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युरोपांतलें नवें जिब्रॉल्टर ६७ करून जर्मनांचा पूर्ण मोड करून रोम लवकर गांठल्यास लढाई आटोक्यांत येण्याचा अवधि नजीक येईल. उलटपक्षी रोम गांठणें जितकें लांबणीवर पडेल, अतितकें लढाईचें शेपूट अधिकाधिकच लांबत जाईल. युरोपांत नवें जिब्रॉल्टर १४ [ दोस्त राष्ट्रांनी फ्रेंच किनाऱ्यावर उतरून नवी आघाडी निर्माण केली त्या वेळी फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील जर्मनीनें नवा निर्माण केलेला शेर- बुर्गचा बळकट किल्ला हस्तगत करावा लागला. हें बळकट ठाणें हस्तगत झाल्यानें महायुद्धाला कलाटणी कशी मिळेल त्याची या लेखांत भवति न भवति केली असून, महायुद्धाची समाप्ति झाल्यानंतर देखील राष्ट्रसंघाला जर्मनीवर दाब ठेवण्याला आणि फ्रान्सला संरक्षणाची शाश्वती वाटू लागण्याला शेरबुर्गचा कसा उपयोग होईल याचें विवेचन यांत असून, जिब्रॉल्टरमुळे जसें भूमध्य- समुद्राचें नाकें ब्रिटिशांच्या हातीं आहे त्याचप्रमाणें अटलांटिक महासागराचें नार्के शेरबुर्गमुळे राष्ट्रसंघाच्या हातीं राहणार असल्यानें त्याला युरोपांतलें दुसरें जिब्रॉल्टर म्हटले आहे. ] दोस्त राष्ट्रांच्या नव्या चढाईत अमेरिकन सैन्याने फ्रान्सच्या किनाऱ्यावरील सर्वोत्कृष्ट व अत्यंत दुर्गम असें शेरबुर्गचें बंदर हस्तगत करून आपल्या पराक्रमाचा उच्चांक गांठला. दोस्तांची युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरील स्वारी म्हणजे जर्म- नीच्या दुर्भेद्य किल्ल्यावरील चढाईच होय. या चढाईत नॉर्मेडीच्या किनाऱ्यावर ब्रिटिश व कॅनेडियन सैन्य उतरवून आणि शेरबुर्ग द्वीपकल्पांतील जर्मन सैन्याची अमेरिकन सैनिकांकडून कोंडी करवून, दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या दुर्भेद्य किल्या- च्या तटाखाली सुरुंगच लावले होते आणि आतां शेरबुर्गचा पाडाव करून अमे- रिकनांनी जर्मनीच्या अटलांटिक तटांत मोठेंच भगदाड पाडलें आहे. याच वेळी माँटगॉमेरीनेंहि नॉर्मडींतून जोराची चढाई चालविली आहे. ही चढाई यशस्वी होऊन, तिकडील तटासहि खिंडार पडलें. आतां यापुढे अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्यें हातास हात मिळवून पॅरिसवर चाल करून जाऊं लागली म्हणजे जर्मनीचा दुर्भेद्य मानलेला अटलांटिक तट जमीनदोस्त झाला असें म्हणावें लागेल. ( केसरी, दि. ३० जून १९४४)