पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध ब्रह्मदेशांतल्या लढाईचें वेळापत्रक ब्रह्मदेशच्या बाजूच्या लढाईची परिस्थिति पाहिल्यास तिकडील वेळापत्रक तर अधिकच अनिश्चित आहे. मार्च महिन्यापासून जपाननें इंफळ व कोहिमा वेढून प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या हद्दीतच पाय रोवला. तेथून त्याला हुसकून देणें मोठें मुष्कि- लीचें होऊन बसले. चाळीस दिवसांच्या झटापटीनंतर आतां कोठें कोहिमा रिज मोकळा झाला आहे. तरी देखील इंफळचा धोका पूर्णतः दूर झालेला नाहीं. इंफळच्या बाजूला जपान्यांच्या सैन्याची भरती वाढतच असल्याची ताजी बार्ता आहे. चीनच्या बाजूनें जपानला ताण बसवावा, तर तेंहि सद्यःस्थितीत संभवनीय दिसत नांहीं. चीनच टेकीला आला असून, रणसाहित्याचा पुरवठा करण्यासाठी तो दोस्तांच्या- पुढें गयावया करीत आहे. तिसऱ्या आघाडीच्या तंगीमुळे दोस्तांनाहि आपलें रणसाहित्य दूरवर पाठविणें जड जात आहे. अशा परिस्थितीत स्टिलवेलच्या सैन्याने मिटकियानच्या भागांत कितीहि पराक्रम गाजविला तरी त्याचा परिणाम संबंध आघाडीवर होऊं शकत नाहीं. चीनचें सैन्य दक्षिणेकडे वळून स्टिलवेलच्या सैन्याला येऊन मिळाले तर सैनिकांची संख्या वाढेल, पण त्यामुळे युद्धसाहित्याचा तुटवडा दूर होण्याच्याऐवजी तो अधिकच जाणवूं लागेल. आसाम-बर्मा सरहद्दीवर पावसाळा सुरू झाल्यावर दोस्तांना चढाई करणे कठीण जाईल. जपानलाहि ती अडचण आहेच, तरी पण दोहोंतला हा फरक लक्षांत घेतलाच पाहिजे की, कोहिमा व इंफळ यांच्या पश्चिमेला जितकी घनदाट बरसात होते तितकी कांहीं ब्रह्मदेशांत होत नाहीं. त्यामुळे कोहिमा व इंफळ येथील दोस्त सैन्याला पावसाळ्यांत हिंदुस्थानशी संबंध ठेवणें जितकें अवघड जाईल तितकें कांहीं जपानी सैन्याला आपल्या पिछाडीशी संबंध राखणे अवघड जाणार नाहीं. यामुळे त्या बाजूचा पावसाळा संपून जाईपर्यंत आसामच्या आघाडीवरील चढाई दोस्तांना निकालांत काढतां येणार नाहीं. आस्ते कदम प्रगति प्रशांत महासागरांतून एकेक बेट हस्तगत करून जपानवरील हल्ला करण्याचें क्षेत्र आटोक्यांत आणण्याचें कामहि आस्ते-आस्तेच चालावयाचें आहे. पश्चिमेकडे एखादी महत्त्वाची लढाई जिंकली व हिटलर फळीसारखी फळी फोडली की, एक- दम शत्रूची बाजू ढासळण्याचा जसा संभव आहे, तसा कांहीं संभव प्रशांत महा- सागरावरील चढाईत नाहीं. अर्थातच ती प्रगति आस्ते कदमच चालणार असल्या- मुळे तिचें वेळापत्रक आगाऊ ठरवितांच येत नाहीं. एवंच महायुद्धाच्या तीन आघाड्यांपैकी पूर्वेकडील आघाडीचा कार्यक्रम स्वाभाविकच दिरंगाईचा आहे. रशियन आघाडीवरील चढाई दोस्तांच्या बाल्कन्स- वरील चढाईवर अवलंबून आहे. आणि दोस्तांची बाल्कन्सवरील चढाई रोमच्या विजयावर अवलंबून आहे. अर्थातच इटालींतील रणभूमीवर आपलें शक्तिसर्वस्व खर्च