पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध बचावासाठी केसरलिंग हा विश्वप्रयत्न करीत आहे. त्याने तेथील झुंजीसाठी आपली खास झुंजार तुफानी पथकं तेथें आणविली असून लिरी खोऱ्यांत अटीतटीनें प्रतिकार केला जात आहे. ६४ गुस्टाव्ह फळी अभेद्य मानली जात असतां ती तीन दिवसांत फुटली तेव्हां लिरी खो-यांतला प्रतिकार तरी कितीसा टिकेल अशी शंका येतें खरी, पण गुस्टाव्ह फळी फोडण्याला जी अनुकूलता लाभली ती आतां यापुढील रणकंदनाला लाभेलच असें नाहीं. गुस्टाव्ह फळी फोडण्यासाठी सेनापति अलेग्झांडर यानें पहिली मह- त्त्वाची युक्ति ही केली की, कसलेल्या आठव्या डिव्हिजनचे सैनिक पूर्वीच्या जागे वरून गुपचूप हलवून ३८ तासांच्या आंत अमेरिकेच्या ५ व्या सेनेच्या साहाय्यार्थ आणून उभे केले. या जुटीचा अपेक्षित परिणाम तत्काळ व्यक्त झाला. दुसरी मह त्त्वाची गोष्ट ही की, तिसऱ्या आघाडीसाठी तयार ठेवलेल्या सैन्यांतलें बरेंचरों सैन्य आणि त्यांचें रणसाहित्य इटालीच्या किनाण्यावरच उतरवून पूर्वीच्या सैन्याचें बल अतोनात वाढविलें. यामुळेच एकाच वेळी दोन हजार तोकांतून भडिमार करतां आला आणि लिरी खोन्यांतील चढाईसाठी एक हजार रणगाडे पुढे लोटतां आले. दोस्तांच्या सैन्याचें हें वाढतें बळ जर्मनांच्याहि आतां लक्षांत आले असून त्यांनींहि आतां आपली राखीव सेना आणि आड्रिआटिक समुद्राच्या किना-याकडची टेहळ- णीची सेना रोमच्या बचावाकरितां आणून उभी केली आहे. यामुळे जर्मनांच्या प्रतिकाराचा जोर वाढला आहे खरा, पण तिकडे आड्रिआटिक किनारा असुरक्षित झाला असल्यानें दोस्तांच्या तिसऱ्या आघाडीचें सैन्य यापुढे इटालीच्या पश्चिम किनाऱ्यावर न उतरतां इटालीच्या पूर्व किनाऱ्यावर अथवा अल्बानियाच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरण्याचा संभव आहे. दोस्तांचें सैन्य कोठें उतरेल ? फ्रान्सवर हल्ला करण्याची हुलकावणी दाखवून त्या बाजूला जर्मनांची पुष्क- ळशी फौज डांबून ठेवून दोस्तांनीं इटालींत सैन्यभरती केली आणि गुस्टाव्ह फळी फोडण्याचा डाव साधला. आतां यापुढे दोस्तांचें सैन्य कोठें उतरणार हा प्रश्नच आहे. बाल्कन्सवर तें उतरेल असे मानून, फ्रान्सांतले सैन्य कमी करून ते त्या बाजूला पाठवावें तर फ्रान्सच्याच किनाऱ्यावर अचानक स्वारी होऊं शकेल. बरें, फ्रान्सांतून सैन्य हलवूं नये म्हटल्यास इटालीचा व बाल्कन्सचा बचाव कसा करावयाचा ? असा दुहेरी पेंच जर्मनांपुढे पडला आहे. यांतून योग्य मार्ग शोधण्यासाठींच रुंडस्टेड आणि रोमेल यांची नुक- तीच फ्रान्सांत गुप्त सल्लामसलत झाली. रुंडस्टेट व रोमेल यांच्यांत खडाजंगी भांडण झाल्याचें वृत्त कांही दिवसांपूर्वी आलें होतें, त्याचा ग्रंथ आतां नीट लागतो. फ्रान्सला धोका अधिक कां बाल्कन्सला धोका अधिक हाच त्यांच्यांतला वादाचा