पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जय निश्चित, काळ अनिश्चित ६३ असले तरी ज्या साधनांनीं व ज्या वेगानें गुस्टाव्ह फळी फोडली गेली त्या साधनांचा च त्या वेगाचाच उपयोग होऊं शकल्यास जर्मनांना हिटलर फळीहि टिकविणें अशक्य होईल. बाँच्या हल्ल्यांचा प्रताप सहा महिने स्थगित झालेली प्रगति एकाएकी इतक्या झपाट्यानें कशी चालू झाली हे कोडे उलगडणें कांही फारसें कठीण नाहीं. जर्मनीवर आणि जर्मनव्यात फ्रान्सवर हजारों बाँबर्सचा जो फेरफटका अलीकडे एकसारखा चालू आहे त्याचा परि- णाम जर्मनीचें लष्करी यंत्र खिळखिळे होण्यांत अवश्य झाला असला पाहिजे. रण- साहित्याच्या कारखान्यावर आगीचा वर्षाव झाल्याने कारखान्यांचे काम बरेच दिवस थंड पडतें; तेलाच्या साठ्यावर ठिणगी पडून तें पेटल्यानें तेलाच्या अभावी कामें बंद पडतात; आगगाडीच्या स्टेशनवर हल्ले झाल्याने वाहतुकीचे डबे जळून निरुपयोगी होतातच. पण त्याशिवाय रेल-रस्ते उखडले गेल्यामुळे आगगाड्यांची. चाहतूक सुरळीत चालू शकत नाही. बाँबफेकी विमानें डोक्यावर घरघरूं लागली म्हणजे खंदकांचा आश्रय घ्यावा आणि ती विमानें आपले विध्वंसनाचें कार्य करून गेली म्हणजे इंजिनियरांनी हजारों मजूर गोळा करून कारखान्यांतील यंत्राची व आगगाडीच्या रस्त्यांची जुळवाजुळव करावी व गाड्या कशाबशा चालू कराव्यात, तो इतक्यांत विमानांची दुसरी धाड येऊन दुरुस्त केलेले रस्ते पुनश्च नादुरुस्त व्हावेत, असा प्रकार एकसारखा चालू आहे. फ्रान्सच्या किना-याकडे जाणाऱ्या आगगाड्यांच्या रस्त्यांवर दोस्तांच्या विमानांचा विशेष कटाक्ष असल्याने त्या बाजूच्या आगगाड्यांचें दळणवळण जवळ जवळ बंद पडल्या- सारखेंच झाले आहे. फ्रेंच किनाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वेची जितकी दुरवस्था झाली आहे तितकी नसली तरी बर्लिनहून रोमकडे जाणारे रस्तेहि असेच वारंवार उध्वस्त केले जातात; त्यामुळे आघाडीवरील सैन्याला रणसाहित्याचा सतत पुरवठा वक्तशीरपणें होऊं शकत नाहीं. गुस्टाव्ह फळीवर चालून जाण्यापूर्वी दोस्तांच्या विमानांनी ब्रेन्नर खिंडीतून बाहेर पडणाऱ्या लोहमार्गाचा आधीं खरपूस समाचार घेतला, याचें कारण वरील मीमांसेंतच आढळून येईल. आणि आतांसुद्धां हिटलर फळीच्या पिछाडीवरील जर्मन सैन्याच्या छावणीवर आधीं वैमानिक हल्ले करून मागाहूनच चढाई करणाऱ्या दोस्त सैन्याचें आगेकूच होत असतें. रोम वांचविण्याचा प्रयत्न अशा रीतीनें जर्मनांचें व्यूह विसकटत विसकटत दोस्त सेना रोम गांठणार हें निश्चित आहे. मात्र याला कालावधि किती लागणार तेवढे मात्र अनिश्चित आहे. रोम गेलें कीं, जर्मनांचा जीव अर्धमेला होणार हे उघड असल्यानें रोमच्या