पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध जय निश्चित काळ अनिश्चित , १३ [ महायुद्धाचें पारडें जर्मनीच्या व जपानच्या विरुद्ध उलटून दोस्त राष्ट्रांना विजय प्राप्त होण्याची निश्चिति दिसूं लागली. त्या वेळी हें पार्डे खरोखरच फिरलें, आतां जर्मनी टिकाव धरूं शकत नाहीं हें निश्चित आहे, मात्र अखेरचा जय मिळण्याला कालावधि किती लागेल तेवढेच अनिश्चित आहे, असे मत या लेखांत स्पष्टपणें दिलें असून तोच अंदाज पुढें खरा ठरला. 1.] हिंदी वीरांचा पराक्रम गेल्या पंधरा दिवसांत दोस्त सैन्यांची जी सर्वच रणक्षेत्रावर सरशी होत चालली तिच्या योगानें मध्यंतरींचें मंदीचे वातावरण बदलून सर्वत्र तेजीचें वाता- चरण अनुभवास येऊं लागले आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच्या आठवड्यांत महा युद्धाला एकप्रकारें स्थगितपणा आला होता. परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठ- वड्यापासून सर्वच आघाड्यांवरचा रंग बदलत चालला. आसामांत कोहिमाची मुक्तता झाली, कायमियांत सेबॅस्टोपोलचा अजिंक्य किल्ला जर्मनीच्या हातून रशि- यनांनी हिसकावून घेतला आणि इटालींत दोस्त सैन्यानें जर्मनांची गुस्टाव्ह-फळी फोडून जर्मनांच्या विजयाच्या आशेच्याहि चिंधड्या उडविल्या. या तीन ठिकाण- च्या विजयांपैकी दोन ठिकाणचे विजय हिंदी वीरांच्या पराक्रमानें प्राप्त झाले आहेत हें नमूद करून ठेवण्यासारखे आहे. इटालींतला जर्मनांनी रचलेला कॅसिनोचा चक्रव्यूह अभेद्य मानला जात होता; परंतु दि. ११ मेच्या दिवशीं गुस्टाव्ह फळीवर दोन हजार तोफांचा भडि- मार सुरू झाला आणि तीन दिवसांच्या आंत हिंदी पट्ट्यांनी रॅपिडो नदी ओलांडून सेंट अँजेलो ठाणें हस्तगत केले. गुस्टाव्ह फळीच्या दुसऱ्या टोंकास अमेरिकन सैन्यानेंहि त्याच दिवशी गॅरिग्लिआनो नदी ओलांडून कॅसलफोर्ट ठाणें बळकाविलें आणि निकराने पुढे चाल केली. या दुहेरी विजयाचा परिणाम असा झाला की, जर्मनांचा कॅसिनोचा चक्रव्यूह उध्वस्त झाला आणि त्यांना तो व्यूह सोडून द्यावा लागला. एवढेच नव्हे तर, गुस्टाव्ह फळी सोडून देऊन तिच्या पाठीमागील हिटलर फळीपर्यंत माघार घ्यावी लागली. गुस्टाव्ह फळी फोडण्याला सहा महिने झगडावें लागले, तेव्हां तिच्याहून अधिक बळकट अशी हिटलर फळी फोडण्याला आणखी किती तरी कालावधि लागेल असें कोणास वाटण्याचा संभव आहे. पण हें कांहीं साधें 'काळकामवेगाचें' गणित नव्हे. गुस्टाव्ह फळी फोडण्याला सहा महिने लागले ( केसरी, दि. २६ मे १९४४ ) .