पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोस्तांचा पहिला खरा विजय सानमारिनो या रेषेवर पाठीशी असलेली अपेनाइन्सची रांग आणि पुढे आर्नो नदी- तीरावर केलेली मोर्चेबंदी यांच्या साहाय्याने जर्मन सैन्य दोस्तांची चढाई थोप- विण्याचा कडोविकडीचा प्रयत्न करील. ही रांग फुटली तरी इटालींतला शेवटचा सामना पो नदीच्या तीरावर होईल; आणि तेथें जर्मन सैन्य हटले तर दोस्तांची सेना आल्प्स ओलांडण्याचा प्राणघातक उपद्व्याप न करतां पूर्वेला वळून ऑस्ट्रि यांत घुसण्याचा सीधा मार्ग धरील. जर्मनीच्या मर्मस्थानावर घाव दोस्तांची चढाई इतक्या पट्ट्याला पोचेपर्यंत किती काळ लोटेल याचा अंदाज सांगतां येत नाहीं. ही मोहीम येत्या नाताळापर्यंत आटोपेल असें चार्चल बोलल्याचें कॅनडांत प्रसिद्ध झाले. पण 'मी तसें बोललो नाहीं' असे सांगून चर्चिलने त्या वार्तेचा ताबडतोब इन्कार केला, तरी पण यावरूनच येत्या तीन-चार महिन्यांत इटालीची गठडी वळेल आणि जर्मनीच्या मानेला तात लागेल, असा मुत्सद्यांचा कयास असावा. परंतु लष्करी तज्ज्ञांना ही गोष्ट इतकी सोपी वाटत नसावी असे वाटतें. रशियांच्या बाजूला जर्मनी एकसारखी माघार घेत आहे, नॉर्वेत धामधूम सुरू झाल्याची वार्ता आहे आणि इटाली व खुद्द जर्मनी या देशांवर जो भयंकर आगीचा मारा होत आहे त्यामुळे लोक हैराण होत आहेत. तयार झालेल्या रणसामुग्रीची आगीने राख होत आहे, कारखाने बंद होत आहेत आणि वाहतुकीच्या साधनांची मोडतोड झाल्यानें सैन्याच्या हालचाली वक्तशीर होऊं शकत नाहींत. इतक्या विविध अड- चणींना तोंड देऊन जर्मनी किती दिवस टिकाव धरूं शकेल याचा नक्की अंदाज करणे शक्य नाहीं; कारण तसा अंदाज करण्याला जरूर ती माहिती उपलब्ध होत नाहीं. रशिया विजयी होऊन पुढें धांव घेत आहे हें खरें. पण त्याची मनुष्यहानि किती होत आहे व त्याचा रण-साहित्याचा पुरवठा टिकून आहे कां, खलास झाला आहे, हें तरी कोठें कळतें ! त्याचप्रमाणें इटालीत रणकंदन सुरू झाल्यावर दोस्तांची विमानें जर्मनी व फ्रान्सवर इल्ह्रीं सारखाच आगीचा वर्षाव करूं शकतील कां नाहीं याची शंकाच आहे. पूर्वेकडील जपानवरील मोहीम कितपत नेट धरूं लागेल हेंहि पाहिले पाहिजे. या सर्वच गोष्टी अज्ञात असल्यानें जर्मनी किती वेळ धीर धरूं शकेल हें जसे नक्की सांगतां येत नाही, याचप्रमाणे दोस्तांची प्रगति किती वेगानें होईल अथवा किती दिवस खुंटून राहील हेंहि सांगवत नाहीं. तथापि यापूर्वी जर्मनी दोस्त राष्ट्रांच्या मर्मस्थानावर घाव घालीत होता, ती स्थिति पाल- टून जर्मनीच्या मर्मस्थानावर घाव बसूं लागले; एवढी उलटापालट सिसिलीच्या विजयानें झाली, म्हणूनच या विजयाला दोस्तांचा पहिला खरा विजय म्हणावयाचें.