पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध


अमेरिकेत जे राजकारण चालू आहे त्यांत या मुद्द्याचा खल चाललाच असेल. परराष्ट्रमंत्री ईडन हे आपल्या हस्तकांसह त्वरेनें केबेकला गेले ते कांहीं लष्करी सल्ला देण्यासाठी गेले नाहींत. इटालीला आपल्या बाजूला वळवून घेऊन जर्मनीविरुद्ध करावयाची चढाई फ्रेंच किनाऱ्यावर उतरून करणे बरें कां इटाली जिंकून नंतर मग तेथून जर्मनीवर हल्ला करणे बरें यांतील तरतमभाव पारखून अखेर निर्णय घेण्यांत येईल; आणि केवळ लष्करी दृष्टीनें न पाहतां राजकीय दृष्टीनें पाहिल्यास इटाली जिंकून तेथे तळ देऊन बसून जर्मनीवरील मोहीम चालविण्यांत फायदा आहे हे उघड होय. यास्तव इटालीची गय न करतां तीवर चढाई करण्याला प्रारंभ होईल व त्याची कडेकोट तयारी झाल्याचीहि वार्ता कानावर येऊं लागली आहे. तेव्हा दोस्तांचं सैन्य इटालीत शिरले तर यापुढे युद्धाला रंग कसा काय चढेल हेच पाहणे आहे.

जर्मनी दोस्तांना कोठें अडवील


दोस्त राष्ट्र इटालीला कांहीं सवलती देण्याचे मान्य करोत अगर न करोत, जर्मनीच्या दृष्टीने इटालींतच दोस्तांच्या सैन्याशीं निकराचा सामना करणे आवश्यक असल्यानें जर्मनी तशा तयारीला लागला आहे. सिसिलींतून जेवढे सैन्य व रण- साहित्य काढून आणले तेवढे तर इटालींत राहणारच; पण त्याशिवाय जर्मनींतून खास पलटणी व रणसाहित्य इटालींत पाठवून इटालीचा उत्तरभाग जर्मनीने लष्करी- दृष्टया व्यापण्यास सुरुवात केली आहे. दोस्तांच्या चढाईला अडविण्याची मुख्य जागा उत्तर इटाली असली तरी दोस्तांना इटालीचा दक्षिण भाग बिनविरोध व्यापतां येईल असा त्याचा अर्थ नव्हे. सिसिलींत दोस्तांचें सैन्य उतरत असतांना विशेष अड- थळा झाला नाहीं; तसा प्रकार इटालीत होणार नाहीं. इटालीत पाऊल ठेवण्याच्या वेळेपासूनच जर्मन सैन्य दोस्तांना अडविण्याची शिकस्त करील. तथापि दोस्तांच्या अमूप विमानांच्या मान्यामुळे जर्मनांना दक्षिण इटालींत फार वेळ टिकाव धरणे शक्य होणार नाही. यामुळे ते उत्तरेकडे मागें सरकत जातील. परंतु लिग्युरिअन अपेनाइन्स पर्वताचा आसरा घेऊन आर्नो नदीच्या कांठी दोस्त सैन्याला अडवून धरण्याची शिकस्त जर्मनीकडून करण्यांत येईल.

पो नदीच्या तीरावर जर्मनांची मोर्चेबंदी चालू झाली आहे, हे खरे असले तरी पो नदीपर्यंत दोस्तांना बिनविरोध जाऊ दिले जाईल असा त्याचा अर्थ होत नाहीं. इटालीवरील दोस्तांची चढाई पश्चिम व पूर्व अशा दोन्ही किनाऱ्यांवरून सुरू होईल. त्या दोहोंत पश्चिम किनाऱ्याचा भाग अधिक डोंगराळ असल्यामुळे त्या बाजूची प्रगति मंदगतीनें चालेल. पूर्व किनाऱ्यावरील प्रगति अधिक झपाट्यानें झाली तरी जसजसे उत्तरेस जावें तसतमा सपाट प्रदेश संकुचित होत जात अस ल्यानें ही प्रगति मंदावेल. अर्थातच अक्षांश ४३३ च्या सुमारास लेगहार्न, फ्लॉरेन्स,