पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोस्तांचा पहिला खरा विजय गट्टी राष्ट्रांच्या सैन्याची कमतरता दिसून आली. दोस्तांचे अवघे एक लक्ष पंचाहत्तर हजार सैनिकच सिसिलींत उतरले होते. तथापि गट्टी राष्ट्रांना या सैन्याला तोंड देण्याइतके मोठें सैन्य सिसिलींत पाठवितां आलें नाहीं; यावरून जर्मनीचें सैन्यबळहि चार ठिकाणी विभागले गेल्यामुळे अपुरें पहूं लागलें आहे हे उघड दिसून आले. एवंच सिसिलीच्या विजयानें दोस्त राष्ट्रांनी ही राष्ट्रां- वर सर्वच साधनांत वरचढपणा सिद्ध केला असून, इटालीचा हा मोठा लचका तोडून त्यांनी त्याला पुरा हैराण केला आहे यांत शंका नाहीं. सिसिली बेटाचें क्षेत्रफळ ९९२६ चौरस मैल असून युद्धापूर्वीची तेथली लोकसंख्या ४० लक्ष होती. एवढा मोठा प्रदेश हातचा गेल्यानें इटालीची मोठी हानि झाली, हें तरं खरचें; पण सिसिली बेट इटालीच्या भूप्रदेशाच्या अगदी लगतचें असल्यानें सिसिली हैं इटालीवरील मान्याचें केंद्रस्थान होईल हा मोठा धोका इटालीला आहे. इटालीची दामटी वळेल सिसिली बेट हातचें जाऊन इटालीवरील हल्ल्याचा धोका बळावला याचा परिणाम इटालीतील राजकारणावर काय होतो ते पाहावें. सिसिलीवरील स्वारी सुरू होतांच इटालींत गडबड उडाली आणि मुसोलिनी अधिकारभ्रष्ट झाला. त्याच वेळी इटाली शरण जाईल अशी लक्षणे दिसत होती; परंतु दोस्त राष्ट्रांनी संपूर्ण शरणागतीची अट घातल्यामुळे इटालींतील राजकारणाचें पारडें फिरलें. वाध्या म्हटलें तरी खातो व वाघोबा म्हटले तरी खातो, मग वाघोबा म्हणण्याची लाचारी तरी कां पत्करा ? अशीच इटालियनांची विचारसरणी असल्यास ती स्वाभाविक आहे. यामुळेच मुसोलिनी गेला व बदाग्लिओ आला तरी प्रतिकार चालूच राहिला. तथापि सिसिलीची मोहीम चालू असतांनाच इटालीवर आकाशांतून जी आग ओकण्यांत आली तिचे चटके इटालियनांना असह्य होऊं लागले आहेत. आतां तर काय, सिसिलीचा सगळा प्रदेश हा युद्धाचा पायाच झाल्याने तेथून विमानांतून व लढाऊ जहाजांवरून इटालीच्या कोणत्याहि भागावर बेफाम मारा करतां येईल. या घोर संकटाला तोंड कसे द्यावयाचं याचा इटालियनांना विचार पडला आहे. सिसिलीची मोहीम आटो- पली हे कळतांच बदाग्लिओनें मंत्रिमंडळाची बैठक तांतडीने बोलावली. पण त्या बैठकींत तरी दुसरे काय ठरणार ? दोस्त राष्ट्र जर इटालीला युद्धांत ओढण्याचा आग्रह न करतां आणि इटाली हीच रणभूमि न करतां त्यांस तटस्थ राहूं देतील तर कदाचित् इटाली शरणचिठ्ठी लिहून देईल. परंतु इटालीच्या रणभूमीवरच जर दोस्त राष्ट्र आणि जर्मनी यांचा झगडा जुंपावयाचा असेल तर इटाली कोणाच्याहि बाजूचा झाला तरी त्याची 'जंबुको हुडयुद्धेन' या न्यायाने दामटी वळल्याविना राहणार नाही. हे जर खरें तर तोंड फिरविल्याची नामुष्की तरी कां पत्करा, असाच विचार बदाग्लिओचें मंत्रिमंडळ करील.| AN 1994