पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ समजून दिला आहे. केसरी पत्राच्या स्वरूपासंबंधानें आणि केसरी संस्थेच्या कामासंबंधाने अनेकांकडून आपापल्या कल्पनांवर आधारलेल्या सूचना येत असतात. तसेंच या संस्थेमध्ये कोणी दाखल झाला किंवा कोणी निघाला, अथवा संपादकीय नांवांत बदल झाला म्हणजे आपापल्या समजुतीप्रमाणे या सूचनांचा बरावाईट अर्थ बसवीत असतात. या सर्वांना व्यक्तिशः उत्तरें देण्याऐवजी केसरी संस्था आणि केसरीचें संपादकत्व यांसंबंधी यथार्थ कल्पना समग्र मांडली म्हणजे आपो- आप ज्याचें त्याला उत्तर सांपडेल, अशा बुद्धीनें हा अग्रलेख लिहिलेला आहे. हा अग्रलेख म्हणजे श्री. करंदीकरांचें एकप्रकारचे संपादकीय आत्म- निवेदनच आहे. कारण त्यांत वर्णन केलेली कामाची दृष्टि आणि भावना ही सर्वात अधिक यथार्थपणे आणि उत्कटपणे श्री. करंदीकर यांच्या संपादकीय कामांत दिसून येते. ते मुख्य संपादक म्हणून झाले असता त्यांनी एक वर्षभर टिळकांचे मोठें छायाचित्र सारखें अग्रलेखावर घातलें होतें. तसेंच मुखपृष्ठावर केसरी या नांवाच्या खाली प्रथम संस्थापक टिळकांचें नांव आणि त्याखाली लगेच विद्यमान संपादकाचें नांव छापण्याची योजना ही देखील करंदीकर यांनी प्रथमच चालू केली. केसरीला टिळकांच्या वेळचें गंभीर उच्च पातळीचें आणि राष्ट्र- कार्यप्रेरक स्वरूप असले पाहिजे आणि वाचकांच्या क्षणिक आवडी-निवडीच्या अनुसार केसरीचें तारतम्य बदलू नये, स्थिर राहावें याविषयीं श्री. करंदीकर हैं सर्वोत अधिक दक्ष होते व असतात. केसरीच्या टिळकांनी ठरलेल्या राष्ट्रीय स्थायीभावामध्यें अवांतर संपादकवर्गाच्या प्रकृतिधर्मानुसार क्वचित् फेरबदल झालेला असेल तर तो अपवादात्मक मानून मूळ टिळकांनी घालून दिलेलें स्वरूप श्री. करंदीकर यांनी सतत डोळ्यापुढे ठेवलेले असे. लो. टिळकांची छाप जी गोष्ट केसरीच्या एकंदर स्वरूपाची तीच श्री. करंदीकर यांच्या लेखनपद्धतीला लागूं करतां येईल. म्हणजे केसरीच्या राष्ट्रीय उपयुक्ततेकडे दृष्टि ठेवणाऱ्या स्वरूपाप्रमाणे त्यांतील भाषा आणि लेखनपद्धति हीं अनुरूप अशींच असलीं पाहिजे, याच दृष्टीनें श्री. करंदीकर यांची भाषा व लेखनपद्धति आपोआप निश्चित झाली आहे. यांच्या भाषेत आणि प्रतिपादन-शैलींत लोकमान्य टिळकांच्या शैलीचें सर्वात अधिक अनुकरण दृष्टीस पडतें. विशेषतः १९१५ ते १९२० पर्यंत त्यांचे लेख टिळकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळें शैलीमध्यें अधिक टिळक - सदृश झाले आहेत. या दृष्टीनें टिळकांच्या छापेत किंवा आपल्या छापेंत स्वत्व जवळ जवळ विलीन करणारे संपादक श्री. काकासाहेब खाडिलकर आणि श्री. करंदीकर हे सर्वांत अग्रगण्य आणि समांतर असे दिसतात. श्री. खाडिलकर यांच्या काळांत त्यांचें आणि टिळकांचें लिखाण वेगळे निवडून काढणें इतरांना फार कठीण जाई, आणि