पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ ‘ खाडिलकरांचा लेख असतांना तो टिळकांचा असावा अशी पुष्कळांची समजूत होत असे. परवापरवापर्यंत केसरींतील अग्रलेख कोणाचे याची नोंद ठेवली जात नव्हती. यामुळे कोणते लेख कोणाचे हा निश्चय इतरांना अनुमानानेंच करावा लागे. श्री. करंदीकर यांच्या या लेखसंग्रहाच्या पहिल्या भागांत पृष्ठ १०९ वर आलेला ' करायला गेला एक, झाले भलतेंच' हा २६ जून १९१७ चा लेख टिळ- कांचा आहे की काय असा क्षणभर भ्रम पडतो. त्यांत आणखी असे दिसतें कीं, इतर लेखक टिळकांचा उल्लेख करतांना 'लो. टिळक ' असा उल्लेख करीत. तसा उल्लेख याच लेखसंग्रहांत पृष्ठ १२९ ते १३४ पर्यंत आलेल्या 'मोर्लेसाहेबांच्या आठवणी' या लेखांत पृष्ठ १३४ वर शेवटून दुसऱ्या ओळींत आला आहे. हा लेख १९१९ मधील म्हणजे टिळकांच्या हयातीतीलच आहे. उलट, आम्ही म्हणतो त्या १९१७ मधील लेखामध्यें पृष्ठ ११० वर टिळकांचा एकेरी उल्लेख आहे, त्यामुळे अधिकच संशय वाटतो. कांहीं वाक्यें आणि विशेषतः शेवटचा छेदक हा टिळ- कांनी लिहिला आहे की काय असा संदेह उत्पन्न होण्यासारखा उतरला आहे. त्यांतील दोनच वाक्यें आम्ही पुढे देतों - “ लॉर्ड पेंटलंड यांच्या या अविचारी कृत्याने स्वराज्य प्राप्त करून घेण्या- बद्दलच्या आस्थेची, कळकळीची आणि निश्चयाची जी लाट आज हिंदुस्थानभर पसरलेली आहे तीच दृढतर व चिरस्थायी करून स्वराज्याचे हक्क मिळेपर्यंत ती तशीच कायम ठेवणें हें या वेळेचें आपले कर्तव्य होय आणि तें मोठ्या उत्साहानें, नेटानें आणि धैर्यानें कोणत्याहि प्रकारचा मतभेद न ठेवतां केवळ मातृभूमीच्या उद्धाराकडे लक्ष देऊन सर्वानी पार पाडावें अशी त्यांस आमची प्रार्थना आहे. " या वेळी टिळक हे विद्यमान असून त्यांच्या होमरूलच्या चळवळीला भरती आलेली होती. श्री. तात्यासाहेब करंदीकर हे केसरींत येऊन दोनच वर्षे झालेली होतीं. यामुळे या वेळीं श्री. करंदीकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या लेखांमध्ये टिळ- कांच्या विचारसरणीशीं अधिकांत. अधिक तादात्म्य दिसून आले हे स्वाभाविक होय. अशा प्रकारें वरील शंकेचा परिहार सांगता येईल. एरवीं, या संग्रहांतील लेखांची निवड स्वतः करंदीकर यांनींच करून दिलेली असल्यामुळे आणि ती काळजीपूर्वक केली असल्यामुळे त्यांच्या आठवणींत चूक झालेली असेल हे संभवनीय नाहीं. राष्ट्रीय जीवनाशी तादात्म्य राष्ट्रांतील राजकीय घडामोडींमध्ये टिळक स्वतः प्रामुख्याने भाग घेत होते. ती सर्वमान्यता १९२० नंतर केळकरांच्या वांव्यास आली नाहीं. तरीहि देशाच्या राजकीय घडामोडींत ते प्रामुख्याने भाग घेणारे होते. केळकरांच्या नंतर हीहि स्थिति राहिलेली नाहीं. तरी पण राष्ट्रीय जीवनामध्ये तादात्म्य ठेवून केसरीनें लिहिलें पाहिजे ही जबाबदारी मात्र कमी झालेली नाहीं. उदाहरणार्थ,