पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध असो किंवा नसो, लाव्हलची सत्ता आरमारावर चालत नाहीं, तेव्हां फ्रेंच आरमार ब्रिटिशांच्या हाती पडण्याचाच संभव जाणून, हिटलरने शस्त्रसंधीच्या अटी झुगा- रून देऊन, अव्याप्त फ्रान्समध्ये आपले सैन्य घुसविले आणि टुलोन बंदराचा ताबा घेण्याचा उपक्रम केला. फ्रेंच आरमार ब्रिटिशांस कां मिळाले नाहीं ? जर्मनीकडून असा धसमुसळेपणा केला जाईल हें जर फ्रेंचांना दिसत होते आणि फ्रेंचांचें बहुमत जर दोस्त राष्ट्रांना अनुकूल असें होतें तर जर्मनीची वाड टुलोनवर येण्यापूर्वीच तेथलें आरमार तेथून निघून जिब्राल्टर किंवा माल्टा येथें जाऊन ब्रिटिशांना कां मिळाले नाही असा प्रश्न साहजिकच पुढे येतो. परंतु फ्रेंचांना जर्मनीविषयीं तिटकारा वाटत असला तरी इंग्रजांच्या गळ्यांत मिठी मारण्याइतकें त्यांच्याविषयी त्यांच्या मनांत प्रेमहि राहिले नाहीं. डंकर्क, ओरान, डाकार, मादा- गास्कर या नांवांची आठवण झाली की, फ्रेंचांच्या मनाची चलबिचल होते. त्यामु- ळेंच द गुल याला तितकासा पाठिंबा न मिळतां अॅड. डार्ला यांच्याविषयी फ्रेंचांना अधिक आदर वाटतो आणि आरमारावर डार्लाची जशी छाप आहे तशी दुसऱ्या कोणाची नाही. अर्थातच ओरान व डाकार येथील प्रसंगांमुळे चिडलेलें फ्रेंच खलाशी आपले आरमार सुखामुखी ब्रिटिशांच्या हवाली करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. फ्रेंचांची मानी वृत्ति जर्मनांच्या विषयींचा जुना द्वेष आणि ब्रिटिशांच्या विषयींची कलुषित बुद्धि या दोहोंच्या झगड्यांत कोणालाच न मिळतां स्वतंत्र राहावें आणि ते शक्य नसेल तर बुडावें पण दुसऱ्याच्या हाती लागूं नये, एवढाच मार्ग फ्रेंच खलाशांच्या पुढे मोकळा राहिला आणि त्या मार्गाचाच अवलंब अखेरीस फ्रेंच आरमाराने केला. मोडेन पण बांकणार नाहीं, ही मानी पुरुषाची वृत्ति अथवा जीभ इस्रडून प्राण देईन पण परपुरु- षाचा हात लागूं देणार नाही, हा सतीचा बाणा या बाबतीत प्रतीत झाला. असले हौतात्म्य फ्रेंचांसारख्या भावनावश लोकांनाच शक्य आहे. व्हर्सायच्या तहानंतर जर्मन आरमाराच्या कप्तानांनीहि आपले आरमार याच वृत्तीनें बुडविलें. पण त्यांना त्या- शिवाय गत्यंतरच नव्हते. फ्रेंचांची कांही तशी अगतिक स्थिति झाली नव्हती. त्यांच्या मनांत असते तर त्यांनी ब्रिटिशांशी नसले तरी अमेरिकनांशी संधान बांधून आपले आरमार यापूर्वीच बाहेर काढून तें वांचविलें असतें; उलटपक्षी जर्मनीलाच मिळाव- याचा त्यांचा हेतु असतां तर, जागच्याजागी राहून, 'आम्ही काय करावें, जर्मनीनें आमच्यावर जबरदस्ती करून आमचें आरमार पकडून नेलें' असे कायदेशीर उत्तर त्यांस देतां आलें असतें. मनांत असले म्हणजे 'अग अग म्हशी मला कां नेशी' ही म्हण आत्मसमर्थनार्थ तयार असतेच ! परंतु दोस्तांना जाऊन मिळा अथवा गट्टी राष्ट्रांना जाऊन मिळा, कांहींहि केले तरी त्यांत मानखंडनाच आहे. वरिवृत्तीचें "