पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांत कोणाचं काय साध उत्तर- आफ्रिका रणक्षेत्र झालें अंतर्गत कारभारांत हस्तक्षेप करून फ्रान्सची सगळी अधिकारसूत्रे लाव्हलच्या हाती येतील अशी तजवीज जर्मनांनी केली तरी युद्धांतले जयापजय त्यांच्या स्वाधीन नसल्यामुळे रणांगणावरील घडामोडींचा फ्रान्सच्या कारभारावर व फ्रेंच जनतेच्या मनावरहि परिणाम घडल्याशिवाय राहिला नाही. फ्रान्सचें मादागास्कर बेट ब्रिटिशांनी आपल्या ताब्यांत घेतलें. अमेरिकेतल्या फ्रेंच वसाहतींवर अमेरिकें- तील संयुक्त संस्थानांचा सासूपणा गाजूं लागला आणि अखेरीस दोस्त राष्ट्रांनी फ्रेंचांच्या उत्तर-आफ्रिकेतील वसाहतीत सैन्य उतरवून तेंच आपले रणक्षेत्र बनविलें. यामुळे अॅड. डार्ला व दगुल यांचे पक्ष बळावून लाव्हलच्या पक्षाचें पारडें हलकें झालें. फ्रेंच जनता जरी व्हिशी सरकारच्या हुकमतीखाली नांदत असली तरी मनांतून तिचा कल दोस्त राष्ट्रांकडे आहे हे स्पष्ट झाले; आणि आफ्रिकेतील वसाहतींतील फ्रेंच सैन्याकडून जर्मनीला उघड विरोध होऊं लागला. असा विरोध होणें हें शस्त्र- संधीच्या अटींच्या विरुद्ध आहे अशी तक्रार जर्मनीनें व्हिशी सरकारकडे केली; परंतु दुबळें व्हिशी सरकार काय करणार? वसाहतींत आमचा अधिकार चालत नाहीं, तेव्हां तुमचें तुम्ही पाहा असें लाचारीचें उत्तर देण्यावांचून व्हिशी सरकारला गत्यंतरच नव्हते. ५५ अव्याप्त फ्रान्समध्ये जर्मन सैन्य अर्थातच इच्छेविरुद्ध दोस्त राष्ट्रांनी जर आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींत सैन्य उतरविलें असेल तर आम्ही ते पाहून घेऊं; पण उद्या जर दोस्तांचें सैन्य फ्रांसच्या दक्षिण किनाऱ्यावर उतरूं लागले तर काय करणार, असा प्रश्न जर्मनीकडून आलाच. यालाहि कांहीं तरी गुळमुळीत उत्तर पेताँकडून मिळाले असेल. परंतु अशा स्वारीच्या वेळीं तुमचें दुलोन बंदरांतलें आरमार काय करणार, असा जेव्हां अगदी अंगाशी भिडणारा प्रश्न आला तेव्हां फ्रेंच सरकार उत्तर काय देणार? तात्पुरत्या तहाच्या अटींत फ्रेंचांचे आरमार तटस्थ राहावें, जर्मनीने ते आपल्या ताब्यांत घेऊं नये आणि व्हिशी सरकारनेंहि ते ब्रिटिशांच्या हाती देऊं नये, असें ठरले होते. परंतु दुबळ्याच्या हातची इस्टेट जो पहिल्या प्रथम घाला घालील त्याच्या हातांत जाणार हैं उघड आहे; तेव्हां व्हिशी सरकारची इच्छा असो वा नसो, दोस्तांचें सैन्य जसें आफ्रिकन किनाऱ्यावर उतरलें, तसेंच तें जर फ्रेंच किनाऱ्यावर उतरण्याकरितां आलें तर फ्रेंचांच्या हातून त्याला विरोध केला जाणार नाहीं हें ओळखून हिटलरनें फ्रेंचांची बंदरें, किनारा व आरमार आपल्या हाती घेण्याचा संकल्प केला. या बाबतींत केवळ अनुमानावरच अवलंबून न राहतां 'दोस्त राष्ट्रांना विरोध करूं नका' अशा आशयाचे हुकूम दिले गेलेले आपल्या हातीं लागले आहेत असें हिटलर म्हणतो! तसा कागदोपत्री परास्यक्ष मिळाला